लोकशाही न्युज नेटवर्क
पुणे : पत्नीच्या त्रासाला कंटाळून पुण्यात गोरख नानाभाऊ शेलार (वय २४, रा. वानवडी) या लष्करी जवानाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. भारतीय सेना दलात नर्सींग असीस्टन्ट असणाऱ्या तरूणाने पत्नीच्या व सासरच्या त्रासाला कंटाळून ही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. गोरख यांनी आत्महत्या करण्यापुर्वी त्रासाबाबतचा एक व्हिडीओ तयार करून ठेवला असून, सुसाईड नोट देखील लिहून ठेवली आहे. पोलीसांनी पत्नीसह इतरांवर गुन्हा दाखल केला आहे.
याप्रकरणी पत्नी अश्विनी युवराज पाटील, युवराज पाटील, संगिता युवराज पाटील, योगेश पाटील, भाग्यश्री पाटील (सर्व रा. शहादा, जि. नंदूरबार) यांच्यावर वानवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत केशव पाटील (शेलार) यांनी तक्रार दिली आहे.
पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरख हा भारतीय सेना दलात भरती नर्सींग असीस्टन्ट म्हणून नोकरीस होता. तो ट्रेनिंगसाठी काही दिवसांपुर्वी वानवडीतील ए.एफ.एम.सी सैनिक आवास येथे आला होता. दरम्यान, त्याचा व अश्विनी यांचा गेल्याच वर्षी विवाह झाला होता.
अश्विनी या गर्भवती होत्या. दरम्यान, पत्नी आणि सासरचे मंडळी गोरख याला त्रास देत होते. त्याला नोकरी घालविण्याची तसेच गर्भपातकरू व तुझ्यावर आणि तुझ्या कुटूंबावर गुन्हा दाखल करू अशी धमकी देत होते. सोड चिठ्ठी दे आणि १५ लाख रुपये दे असे म्हणून त्याला त्रास दिला जात होता.
या सततच्या मानसिक व शारिरीक छळाला कंटाळून गोरख यांनी तीन दिवसांपुर्वी (दि. ६ फेब्रुवारी) ट्रेनिंगसेंटर परिसरात तो राहत्या असलेल्या खोलीत गळफास लावून आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापुर्वी त्यांनी सुसाईड नोट लिहीली आहे. तसेच, त्याने मोबाईल पत्नी व सासरच्यांकडून होणाऱ्या त्रासाचा व्हिडीओ देखील शुटकरून ठेवला होता. पोलीसांकडून हे सर्व जप्त करण्यात आले आहे