ICICI बँकेच्या ग्राहकांना झटका! ‘या’ सेवांचे शुल्क वाढणार

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

आयसीआयसीआय बँकेच्या ग्राहकांसाठी महत्वाची बातमी आहे. जर तुमचेही खाते आयसीआयसीआय बँकेत असेल तर तुम्हाला बँकिंग सेवांवर अतिरिक्त शुल्क लागू शकते. बँकेने क्रेडिट संबधित विविध सेवांवरील शुल्कांमध्ये वाढ केली आहे. 10 फेब्रुवारी पासून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या सेवांच्या शुल्कात बदल

बँकेतर्फे जारी करण्यात आलेल्या माहितीनुसार, बँकेने अनेक सेवांचे शुल्क वाढवले आहेत. यामध्ये लेट पेमेंट शुल्काचा सामावेश आहे. 10 फेब्रुवारी पासून या अतिरिक्त शुल्काची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. याशिवाय तुमचा चेक परत गेला तर बँक संपूर्ण Due Amount वर 2 टक्के दराने शुल्क वसूल करणार आहे. यासाठी बँक कमीत कमी 500 रुपये वसूल करणार आहे. जर तुम्ही आयसीआयसीआय बँकेचे ग्राहक असाल तर, तुमच्या खिशाला कात्री बसणार आहे.

इतर बँक किती शुल्क आकारतात

याशिवाय इतर बँका 10,001 ते 25000 दरम्यानच्या पेमेंटवर Due आहे. तर यावर तुम्हाला 900 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. तसेच 25001 ते 50000 रुपयांपर्यंतच्या Due पेमेंटवर तुम्हाला 1000 रुपयांचे शुल्क आकारण्यात येते. साधारणतः लेट पेमेंट शुल्क वेगवेगळ्या बँकांचे वेगवेगळे आहे. एचडीएफसी बँक आणि एसबीआय सारख्या प्रमुख बँका 50000 रुपयांवरच्या लेट पेमेंटवर 1300 रुपये शुल्क आकारतात.

Leave A Reply

Your email address will not be published.