आराधना कॉलनीमध्ये ‘योग फॉर ऑल’ नि:शुल्क योग शिबिराचा शुभारंभ

0

मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् योग अँड नॅचरोपॅथीचा उपक्रम

जळगाव ;- के. सी. ई. सोसायटी संचालित मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी अंतर्गत द्वारे प्लॉट न. ५, मालती निवास, आराधना कॉलनी मध्ये दि. ६ जून ते १३ जून पर्यंत सात दिवसीय नि:शुल्क योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजीत या शिबिराचा शुभारंभ ६ जून रोजी सायकांळी ६ वाजता करण्यात आला. शुभारंभ प्रसंगी सोहम योग अँड नॅचरोपॅथी चे संचालक डॉ. देवानंद सोनार, पी. जी. कॉलेज चे प्राचार्य व्ही. एस. झोपे, विलास महाजन यांची उपस्थिती लाभली. सुरवातीला मान्यवरांच्या हस्ते ओंकार प्रतिमेचे पूजन आणि दीपप्रज्वलन करून ओंकार प्रार्थना करण्यात आली. डॉ. देवानंद सोनार यांनी याप्रसंगी योगाचे आपल्या जीवनातील महत्व आणि योग साधनेची आवश्यकता या विषयावर प्रकाश टाकला. प्राचार्य व्ही. एस. झोपे यांनी योगाचे महत्व पटवून देत मू. जे. महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग अँड नॅचरोपॅथी च्या शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी उपस्थितांना माहिती दिली.

आराधना कॉलनी मध्ये सुरु असलेल्या या शिबिराला योगशिक्षिका सौ. ज्योती चौधरी आणि योगशिक्षक सचिन कोल्हे हे मार्गदर्शन करणार आहेत. आंतराष्ट्रीय योग संघटनेच्या ‘योग फॉर ऑल’ या संकल्पने अंतर्गत हे शिबीर सकाळी आणि सायंकाळी ६ ते ७ या वेळात पूर्णत: नि:शुल्क स्वरूपात घेतले जाणार आहे. तरी परिसरातील महिला, पुरुष विद्यार्थ्यांनी आपल्या सोईच्या वेळेत उपस्थित राहून या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे. शिबिराच्या यशस्वितेसाठी, विलास महाजन, अभय भंगाळे, मिलिंद पाटील आणि प्रशांत कोल्हे यांचे सहकार्य लाभत आहे. शिबिराच्या शुभारंभ प्रसंगी परिसरातील ४० महिला पुरुष, विद्यार्थी आणि जेष्ठ नागरिकांची उपस्थिती लाभली.

 

Leave A Reply

Your email address will not be published.