खाद्य संस्कृती; ब्रेड स्विस रोल

0

लोकशाही विशेष लेख

आपल्याला ओरीजिनल रेसिपींच्या डिटेल्स तर सोशल मीडियावर मिळतातच, पण माझ्या सोबत तुम्हाला नेहमीच इनोव्हेटिव्ह आणि थोडे ट्विस्ट वापरून केलेले पदार्थ बनवलेले पाहायला मिळतील.

बरेच दिवस आपण अगदी झणझणीत, चमचमीत, तोंडाला पाणी आणणारे पदार्थ केले. पण आपल्या सोबत बरेच जण आपल्या खाण्यापिण्याच्या बाबतीत खुप हेल्थ कॉन्शस असतील ना? त्यांचा योगा, डायट, हलका-फुलका आहार, कॅलरीज, प्रोटिन्स आणि बरंच काही त्यांच्यासाठी सुद्धा काही तरी करुयात. तसे माझ्या लिस्ट मध्ये भरपूर मेन्यू आहेतच, मग आजचा मेनू अगदी हलका-फुलका असा ब्रेकफास्टसाठी बनवूया. ज्यातून दिवसाची सुरुवात एकदम फिट होईल.

साहित्य :

ब्रेड, तीळ, काकडी, कांदा, गाजर, कोबीची पान, केचअप, मेयाॅनीज, द्राक्षं (आवडत असलेली कोणतीही सिझनल फळं), ड्राय फ्रूट (आवश्यक असल्यास)

कृती :

१) ब्रेडचे काट काढायचे असल्यास काढा नाही तर तसेच ठेवले तरी चालेल.
२) मेयाॅनीज आणि केचअप मिक्स करुन घ्या.
३) काकडी, गाजर, कांदा, कोबीची पानं बारीक चिरून घ्या, द्राक्षं कट करून घ्या, आणि मेयाॅनीज आणि केचअपच्या मिश्रणात एकत्र करून घ्या. ड्राय फ्रूट सुद्धा
बारीक कापून घ्या.
४) आता पोळपाटावर तिळ पसरवा व त्यावर ब्रेडला हलक्या हाताने लाटण्याने लाटा.
५) ब्रेडच्या एका बाजूला सॅलडचे मिश्रण घालून त्याचा रोल करून खायला द्या. ब्रेड स्विस रोल खाताना खूप एनर्जेटिक आणि टेस्टी वाटेल, तर नक्की ट्राय करा.

आहे ना अगदी फटाफट तयार होणारी ब्रेकफास्ट रेसिपी आणि ती ही कमी खर्चात, चला तर बनवायला घ्या आणि तुमचे अभिप्राय कळवा.

अपर्णा स्वप्निल कांबळे/नांगरे
९८९२१३८१३२
पत्रकार/फूड ब्लॉगर

Leave A Reply

Your email address will not be published.