तरुणाला भरधाव वाहनाने उडविले

0

पारोळा : सासूरवाडीला जात असलेल्या तरुणाला भरधाव वाहनाने उडविल्याची घटना पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेजजवळ रविवारी सायंकाळच्या सुमारास घडली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या महेश राजेंद्र जावरे (वय २५, रा. भोंडण) या तरुणाचा उपचार सुरु असतांना मृत्यू झाला. याप्रकरणी पारोळा पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

पारोळा तालुक्यातील भोंडण येथे महेश राजेंद्र जावरे हा तरुण वास्तव्यास होता. रविवारी सायंकाळी महेश हा दुचाकीवर मेहूटेहू येथे आपल्या सासूरवाडीला जाण्यासाठी निघाला. दरम्यान, पारोळा कजगाव रस्त्यावरील डी. बी. पाटील कॉलेज जवळ भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात वाहनाने महेशच्या दुचाकीला धडक दिली. यामध्ये महेश हा गंभीर झाला होता. नागरिकांच्या मदतीने महेशला रुग्णवाहिका चालक ईश्वर

ठाकुर, यश ठाकूर यांनी पारोळा कुटीर रुग्णालय येथे दाखल केले. याठिकाणी डॉ. शिवदास चव्हाण, परिचारिका कामिनी पवार यांनी प्रथमोपचार करून त्याची प्रकृती गंभीर असल्याने त्याला धुळे येथे हलविले. येथे महेशवर उपचार सुरु असतांना त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी पारोळा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.