गारठा वाढताच अंड्याचे दर वधारले, शंभरी गाठणार ?

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

राज्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसताच गारठा देखील मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. हिवाळ्यामध्ये अंड्याची मागणी वाढते त्यातच आता अंड्याचे देखील दर वधारले आहेत. अंड्याच्या डझनामागे १५ रुपयांनी भाववाढ झाली आहे.

 

कोंबड्यांचे खाद्यात वाढ 

कोंबड्यांचे खाद्य असलेल्या मका व सोयाबीनच्या दरवाढीसह कुक्कुट पालनाचा खर्च वाढल्यामुळे पोल्ट्रीधारकांकडून अंड्यांची दरवाढ करताच किरकोळ व्यावसायिकांनीही वाढ केली आहे. यामुळे महिन्याभरापूर्वी ६ रुपयांचे एक अंडे आता ७ रुपयाला विकले जात आहे तर डझनाचा दर हा ६५ वरून ७५ वर आला आहे. तर एका क्रॅरेट अंड्यासाठी १६५ ते १७० रुपये मोजावे लागत आहे. थंडी वाढल्यास दर शंभरी पार करण्याची शक्यता असल्याची माहिती अंडे  व्यावसायिकांनी दिली आहे.

सर्वात जास्त प्रोटिनची मात्रा असलेला सर्वात स्वस्त पौष्टिक आहार म्हणून थंडीत अंडी खाण्याचे प्रमाण वाढते. यामुळे मागणीतही वाढ होते. नोव्हेंबर अखेरपर्यंत अद्याप गारवा असला तरी थंडीला सुरुवात झालेली नाही. मात्र आताच अंड्यांचे दर प्रती नग दीड ते दोन रुपयांपर्यंत वाढले आहेत. थंडीच्या हंगामात नेहमीच अंड्याच्या किमतीत वाढ होते. मात्र ती वाढ किरकोळ असल्याने त्याचा जास्त परिणाम जाणवत नसतो. पण यावर्षी ही वाढ जास्त आहे.

नवरात्रीपासून १० ते २० पैशांनी वाढ होती. काही दिवसात एकदम भाववाढ झाली, ५५ रुपये डझन असलेली अंडी ७० ते ७५ रुपयांवर पोहोचले. तर शेकड्याचे दर ५५० पर्यंत पोहोचले आहेत. वातावरणातील बदल व थंडी कमी असल्याने दर स्थिरावले आहे, थंडी वाढताच मागणीही वाढेल, यासह भावही शंभरी गाठतील अशी शक्यता अंडे विक्रेते विजय छाबडीया यांनी व्यक्त केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.