कारची डंपरला धडक ; पाच जण जखमी

0

मुक्ताईनगर , लोकशाही न्यूज नेटवर्क

कारने डंपरला मागून जोरदार धडक दिल्याने यात पाच जण जखमी झाल्याची घटना शहरातील मुक्ताई चौकातील उड्डाणपुलावर रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली आहे. या अपघातात पाच जखमी झाले असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे.

सूत्रांची माहिती अशी कि, मलकापूर येथून जळगावकडे येणारी कार क्रमांक (एमएच १४ ईपी ६८६७) ही मुक्ताईनगर शहरातील मुक्ताई चौकातील उड्डाणपुलावरून सुसाट वेगाने जात असतांना पुढे जाणाऱ्या डंपर (एमएच १९ सीवाय ७७३३) ला मागून जोरदार धडक दिली. या अपघातात चालकासह इतर चौघे असे पाच जण जखमी झाले. जखमीतील एकाची प्रकृती चिंताजनक असून जखमींना तातडीने स्थानिक नागरीक व वाहनधारकांच्या मदतीने मुक्ताईनगर ग्रामीण रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, कारचे एअरबॅग्ज ओपन झाल्यामुळे इतर बचावले आहे. या अपघातात कारचा पुढच्या भागाचा पुर्णपणे चक्काचूर झाला आहे. . अपघातामुळे उड्डाणपुलावर वाहतूकीचा काहीवेळ खोळंबा झाला होता. स्थानिक पोलीसांच्या मदतीने अपघातग्रस्त वाहन बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबत पोलिसांत नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.