मौलाना अर्शद मदनी यांच्या विधानाला आक्षेप ; धर्मगुरूंनी व्यासपीठ सोडले

0

नवी दिल्ली , लोकशाही न्यूज नेटवर्क

जमियत-ए-उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रमात मौलाना मदनी म्हणाले की, तुमचे पूर्वज हिंदू नव्हते. ते मनु म्हणजे आदम होते. ते एवढ्यावरच थांबले नाही. ते पुढे म्हणाले की, ओम व अल्लाह एकच आहेत. त्यांच्या एका विधानावर मोठा वाद झाला.अनेक धर्मगुरुंनी आक्षेप नोंदवत व्यासपीठ सोडले.
दिल्लीतील राम लीला मैदानावर आयोजित जमियत-ए-उलेमा-ए-हिंदच्या कार्यक्रम रविवारी आयोजित करण्यात आला होता.

मौलाना मदनी यांच्या विधानावर जैन मुनी लोकेश यांनी तीव्र हरकत नोंदवली. ते म्हणाले की, हे अधिवेशन माणसे जोडण्यासाठी आयोजित केले आहे. त्यामुळे अशा विधानाचे कोणतेही औचित्य नाही, असे ते म्हणाले. त्यानंतर त्यांनी कार्यक्रम स्थळ सोडले. त्यांच्यानंतर अन्यही काही धार्मिक संतांनी या कार्यक्रमातून
मदनींच्या या विधानावर अनेक धर्मगुरुंनी आक्षेप नोंदवत व्यासपीठ सोडले.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर जमियत उलेमा-ए-हिंदच्या 34 व्या अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी मौलाना मदनी म्हणाले – मी विचारले की तेव्हा कुणीही नव्हते. ना श्रीराम, ना ब्रह्मा, ना शिव… तेव्हा कुणीही नसताना मनुने कुणाची पूजा केली? असा माझा प्रश्न आहे. कुणी ते महादेवाची पूजा करत होते असे सांगतात. तर काही जण मनुने ओमची पूजा केल्याचा दावा करतात. ओम कोण आहे? अनेकांनी सांगितले की, त्याला कोणतेही रूप किंवा रंग नाही. ते जगात सर्वत्र आहेत. अरे बाबा, याला आपण अल्लाह म्हणतो. तुम्ही त्याला देव म्हणता.

Leave A Reply

Your email address will not be published.