जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क
दुपारून वातावरणात उकाडा जाणवू लागला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळांची तीव्रता वाढली आहे. दिवसा तापमान उच्चांकावर असताना रात्री मात्र कमाल तापमान १० अंश सेल्सिअसवर स्थिरावले आहे. फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यात कमाल तापमान ३२ अंशांवरून ३५ अंश सेल्सिअसच्या पुढे गेले. गेल्या नाेव्हेंबर ते फेब्रुवारी या महिन्यात शनिवारी प्रथमच कमाल तापमान ३५.८ अंशाच्या उच्चांकावर पाेहचले हाेते.
त्यामुळे दिवसा वातावरणात उन्हाच्या झळा आणि उकाडा जाणवत हाेता. गेला आठवडाभर जिल्ह्यात कमाल तापमान ३३ अंशांवर स्थिर हाेते. शनिवारी त्यात वाढ झाली. कमाल तापमान ३५ अंशांपुढे जात असताना दुसरीकडे किमान तापमान १० अंश सेल्सिअवर स्थिर आहे. पुढील चार दिवस किमान तापमानामध्ये एक ते दाेन अंशांची घट हाेवू शकते असा अंदाज आहे.