कार दुचाकीच्या अपघातामध्ये दोन मावस भाऊ ठार ; एक गंभीर

0

जामनेर तालुक्यातील फत्तेपुर लोणी रस्त्यावरील घटना

 

जळगाव :- – इको कार आणि दुचाकीच्या झालेल्या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघे तरुण मावसभाऊ ठार झाल्याची घटना आज 18 रोजी जामनेर तालुक्यात फत्तेपूर-लोणी रस्त्यावर घडली असून यात कारचालक गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस स्टेशनला घटनेची नोंद करण्याचे काम सुरु होते.

याबाबत सूत्रांनी दिलेली माहिती अशी की फत्तेपूरहून जळगाव येथे इको कार (एमएच १९ ईए २७७९) हि जळगावला वृद्ध रुग्णाला घेऊन निघाली होती. कारमध्ये वृद्ध महिला, पुरुष, त्यांचा नातू व सून असे होते. कार लोणी गावाजवळ आली असताना समोरासमोर दोघांची जबर धडक झाली, अपघात इतका भीषण होता की, दुचाकीवरील सौरव कैलास कोळी (वय २२, रा. कोदोली ) हा तरुण मयत झाला. तर दुचाकीवरील दुसरा शुभम दिनकर जाधव (वय २८, रा. शिगाईत ता. जामनेर) हा गंभीर जखमी झाला.त्याला जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. तेथे प्रथमोपचार झाल्यावर खाजगी रुग्णालयात नातेवाईकांनी नेले होते. तेथे त्याचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. तर इको कारवरील चालक मंगेश संतोष कोळी (वय २०, रा. फत्तेपूर) हादेखील गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्याच्या पायाला, कमरेला व डोक्याला गंभीर मार लागला आहे. पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान पहूर पोलीस स्टेशनला अपघाताची नोंद करण्याचे काम सुरु होते.

Leave A Reply

Your email address will not be published.