चोपड्याजवळील अपघातात पिंपरखेडचा तरुण जागीच ठार

0

चोपडा : जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील रहिवासी असलेला तुषार मधुकर सोनवणे याच्या दुचाकीला चोपडा ते धरणगाव रस्त्यावर अद्यात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर त्याच्यासोबत दुचाकीवर बसलेला सामरोद येथील सौरव गजानन सपकाळ हा देखील जखमी झाल्याची घटना १२ रोजी दुपारी घडली. या घटनेमुळे सर्वत्रह ळहळ व्यक्त होत आहे.

जामनेर तालुक्यातील पिंपरखेडा येथील तुषार मधुकर सोनवणे (वय २४) हा त्याचा मित्र तथा जामनेर तालुक्यातील सामरोद येथील रहिवासी सौरव गजानन सपकाळ (वय २१) हे दोघेही १२ रोजी दुपारी पावणेचार वाजेच्या सुमारास चोपड्याकडून जामनेरकडे जात होते. चोपडा तेअज्ञात वाहनाने धडक दिली. या अपघातात तुषार मधुकर सोनवणे हा गाडीखाली आल्याने जागीच ठार झाला, तर सौरव सपकाळ हा देखील या अपघातात जखमी झाला आहे. या अपघातात तुषार सोनवणेच्या डोक्याच्या चेंदामेंदा झाला आहे. मृत तुषार सोनवणे हा जामनेर शहरात सलून दुकानावर कामाला होता. त्याच्या पश्चात आई-वडील, दोन बहिणी असा परिवार आहे. तो घरातला कर्ता व एकुलता एक मुलगा होता. या घटनेची माहिती मिळताच त्याच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला.

Leave A Reply

Your email address will not be published.