चोरीचा बनाव करत तरुणाने स्वतःला जाळून घेतले

0

जळगाव / चोपडा : रस्त्याने जात असलेल्या तरुणाला लूटल्यानंतर चोरट्यांनी त्याला पेट्रोल टाकून जाळल्याचा बनाव करीत भूषण दिलीप पाटील (वय ३० रा.घोडगाव ) या तरुणाने स्वतःला जाळून घेतले. ही धक्कादायक घटना बुधवारी रात्रीच्या सुमारास चोपडा येथील धरणगाव रस्त्याजवळील पाटचारीजवळ घडली. घटनेचे गांभिर्य लक्षात घेता जिल्हा पोलीस दलाने काही तासातच घटनेचा उलगडा केला. यामध्ये तरुणाने मृत्यूपूर्वी दिलेल्या जबाबावरुन आपणच स्वतःला पेटवून घेतल्याची कबुली दिल्यानंतर संपूर्ण घटनेचा उलगडा झाला.

चोपडा तालुक्यातील घोडगाव येथे भूषण पाटील हा अविवाहीत तरुण वास्तव्यास होता. शेती काम करुन तो आपल्या कुटुंबाला हातभार लावत होता. दि. ११ रोजी तो चोपडा येथे आला होता. परंतु सायंकाळपर्यंत तो घरी परतला नाही. सायंकाळच्या सुमारास बाटलीत पेट्रोल घेवून तो धरणगाव रस्त्यावरील पाटचारीजवळ आला. याठिकाणी त्याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून घेत जाळून गेले. काही क्षणातच भूषण पुर्णपणे भाजला गेल्याने त्याने अंगाची होणारी लाहीलाही कमी होण्यासाठी शेजारीच असलेल्या पाटचारीच्या पाण्यात उडी घेतली, आणि रात्रभर तो पाटचारीतील पाण्यातच बसलेला होता. गुरुवारी सकाळच्या सुमारास पाटचारीजवळून जाणाऱ्या एका व्यक्तीचा मोबाईलवरुन भूषणने नातेवाईकांसोबत संपर्क साधत त्यांना घटनेची माहिती दिली. यावेळी त्याने

आपल्याला चोरट्यांनी माझ्याकडील रक्कम लूटून घेत पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे सांगितले. नातेवाईकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी अवस्थेत असलेल्या भूषणला तात्काळ चोपड़ा ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले.

 

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक एम. राजकुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी कृषिकेश रावले, स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील, चोपडा शह पोलीस निरीक्षक के के पाटील यांच्यासह एलसीबीच्या पथकाने धाव घेत पाहणी केली. त्यानंतर पथकाला या घटनेचा उलगडा करण्यासाठी तपासाबाबत सूचना दिल्या.

सुरुवातीला रचला घटनेचा बनाव सरुवातीला जखमीकेली असता, त्याने आपण घराकडे जात असतांना

दुचाकीवरुन आलेल्या चोरट्यांनी आपला मोबाईल चोरुन नेला असे सांगितले. त्यानंतर तेच चोरटे पुन्हा भेटले त्यांनी भूषणला दुचाकीवरुन घेवून जात त्याला पाटचरीजवळ नेले.त्याला मारहाण करीत त्याच्याकडे असलेली रोकड हिसकावून घेतली. त्यानंतर चोरट्यांनी आपल्याला पेट्रोल टाकून जाळून टाकल्याचे भूषणने पोलिसांना सांगत पोलिसांची दिशाभूल केली.

 

पुर्णपणे भाजलेल्या अवस्थेत असलेल्या भूषणने सांगितलेल्या वर्णनानुसार एलसीबीसह चोपडा पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान, रुग्णालयात असलेल्या भूषणला त्यांनी व्हीडीओ कॉलद्वारे संशयितांना दाखविले असता, त्याने यांनीच आपल्याला जाळल्याचे सांगितले होते.

जिल्हा रुग्णालयात गंभीर अवस्थेत असलेल्या भूषणची पोलीस चौकशी करत होते. त्यावेळी तो पोलिसांना घटनेबाबत वेगवेगळे जबाब देत होता. परंतु त्याच्या जबाबातील तफावतीमुळे पोलिसांना देखील या घटनेबाबत थेट निष्कर्ष काढू शकत नव्हते. अखेर पोलिसांनी भूषणला सहानुभूती आणि विश्वास घेत त्याची पुन्हा चौकशी केली. यामध्ये त्याने पोलिसांना सत्य हकीकत सांगत आपणच स्वतःला जाळून घेतल्याची कबुली दिली. त्यामुळे भूषणने मृत्यूपूर्वी • दिलेल्या कबुली जबाबामुळे पोलिसांनी देखील सुटकेचा निश्वास सोडला.

 

Leave A Reply

Your email address will not be published.