अनुपमा फेम ‘या’ अभिनेत्याचे निधन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

 

एकाच दिवशी टेलिव्हिजन इंडस्ट्रीला खूप मोठा धक्का बसला आहे. 22 मे रोजी अभिनेता आदित्य सिंह राजपूतचं (Aditya Singh Rajput) निधन झालं. त्यानंतर मंगळवारी ‘साराभाई वर्सेस साराभाई’ (Sarabhai vs. Sarabhai) फेम अभिनेत्री वैभवी उपाध्यायने (Vaibhav Upadhyaya) कार अपघातात आपले प्राण गमावले. आता ‘अनुपमा’ (Anupama) मालिकेत धीरज कुमारची भूमिकाची साकारणारे अभिनेते नितेश पांडे (Nitesh Pandey) यांनी या जगाचा निरोप घेतला आहे. वयाच्या ५१व्या वर्षी जगाचा निरोप घेतला आहे.

‘अनुपमा’ प्रसिद्ध शोमध्ये रुपाली गांगुलीची (Rupali Ganguly) मैत्रिण देविकाच्या पतीची भूमिका साकारून ते घराघरात लोकप्रिय झाले होते. त्यांच्या निधनाच्या बातमीने सर्वांनाच धक्का बसला आहे. त्याच्या निधनाच्या बातमीने इंडस्ट्रीत शोककळा पसरली आहे. नाशिकजवळील इगतपुरी याठिकाणी पहाटे 2 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शूटनिमित्त ते तिथे गेले होते. कार्डिॲक अरेस्ट (Cardiac arrest) इतका तीव्र होता की जागीच नितेश यांनी प्राण गमावल्याची माहिती समोर येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.