अन्‌ सप्तपदी आधीच नवदामपत्याने घेतली शपथ!

होय... आम्ही निर्भयपणे मतदान करणार : थेपडे विद्यालयाचा पुढाकार

0

जळगाव : सहजिवनाची सुरुवात करणाऱ्या नवदापत्याने सप्तपदी आधीच मंडपात हजारो वऱ्हांडीच्या साक्षिने निर्भयपणे मतदान करणार असल्याची शपथ घेतली आहे. तालुक्यातील म्हसावद येथील या नवदामपत्याच्या लग्न समारंभात झालेल्या या प्रबोधनाची संपूर्ण जिल्ह्यात चर्चा रंगली. म्हसावद येथील स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालयाच्या पुढाकाराने हा आगळावेगळा शपथ सोहळा संपन्न झाला.
तालुक्यातील म्हसावद येथे रमेश आनंदा चिंचोरे यांचे सुपुत्र जिग्नेश आणि मोहन शंकर कंखरे यांची सुकन्या चिन्मयी यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. या दरम्यान स्वातंत्र्य सैनिक पं.ध.थेपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.चौधरी आपल्या सहकारी वर्गासह विवाहस्थळी दाखल झाले. यावेळी त्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आयुष प्रसाद यांनी मतदान जनजागृतीबद्दल काढलेल्या स्विप उपक्रमांतर्गत पत्राची माहिती देत वधू-वरासह आप्तेष्टांसह संबधितांना विश्वासात घेत या राष्ट्रीय कार्यक्रमात आपणही सहभागी होण्याची विनंती केली. यावेळी सहजिवनाची सुरुवात करणाऱ्या जिग्नेश व चिन्मयी या नवदामपत्याने यास होकार देत हजारो वऱ्हांडीच्यासह सप्तपदी आधीच निर्भयपणे, कोणत्याही आमिषाला बळी न पळता, धार्मिक, जातीयतेच्या प्रभावाखाली न येता
स्वंयस्फुर्तीने मतदान करणार असल्याची शपथ घेतली. विद्यालयाने निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर केलेल्या या जनजागृतीच्या कार्याची चर्चा रंगली.
याप्रंसगी विद्यालयाचे मुख्याध्यापक पी.डी.चौधरी, उपमुख्याध्यापक बच्छाव सर, वाय.पी. चिंचोरे, सी.एम.राजपूत, पी.पी. मगरे, गिरासे सर, नाना चौधरी यांच्यासह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, गावातील पदाधिकारी, वऱ्हाडींसह मित्र मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.