Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • दलित, ओबीसींना हिंदू म्हणते अन् अधिकारापासून रोखते!
    • उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे दिल्लीत एकाच ताटात खातात!
    • ओळख लपविण्यासाठी बुरखा घालून घरी नेत अत्याचार
    • राज्यात उष्णतेची लाट; प्रशासनाकडून सतर्कतेचे आवाहन
    • माणसाने झेपेल तितकेच बोलावे!
    • बिबट्याच्या कातडीसह पाच तस्कर गजाआड!
    • किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी
    • शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»ताज्या बातम्या»जळगावात ठाकरे गटाला भगदाड!
    ताज्या बातम्या

    जळगावात ठाकरे गटाला भगदाड!

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveApril 16, 2024No Comments1 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    लोकशाही न्यूज नेटवर्क

    जळगाव : लोकसभा निवडणुका तोंडावर आलेल्या असताना ठाकरे गटाला मात्र धक्क्यांवर धक्के सहन करावे लागत आहेत. शिवसेनेत फूट पडल्यापासून कार्यकर्ते व पदाधिकारी यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे वाढता ओघ अजूनही सुरुच आहे. त्यामुळे ठाकरे गटाला लागलेली गळती काही थांबायचे नाव घेत नाही. त्यातच आता ठाकरे गटाला जळगावातही मोठे भगदाड पडले आहे. जळगावमधील पदाधिकाऱ्यांसह चारशे कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत रविवारी रात्री हा पक्षप्रवेश पार पडला.
    जळगाव जिल्ह्यातील अमळनेर व चोपडा परिसरातील उद्धव बाळासाहेब ठाकरे गटातील तसेच शरद पवार गटातील जवळपास चारशे कार्यकर्त्यांनी व प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत रात्री उशिरा शिवसेनेत प्रवेश केला. बुलढाणा येथील बुलढाणा रेसिडेन्सी क्लब येथे हा पक्षप्रवेश पार पडला. यावेळी मंत्री गुलाबराव पाटील, बुलढण्याचे खासदार प्रतापराव जाधव व आमदार चिमणराव पाटील उपस्थित होते. हे सर्व कार्यकर्ते जवळपास 60 ते 70 वाहनांतून बुलढाण्यात पोहोचले होते.

    शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही : शिंदे
    पक्षप्रवेशानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यमांशी संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, आम्ही निवडणुकीत गुंतलो असलो तरी मी दररोज सकाळी माहिती घेतो. त्याप्रमाणे मी मुख्य सचिव, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी यांच्याकडून माहिती घेतो. त्यांना सूचना देतो की, तात्काळ पंचनामे करा हे सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर जागरूक आहे. शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, त्यांना नुकसान भरपाई मिळेल.

    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    माणसाने झेपेल तितकेच बोलावे!

    April 17, 2026

    किनगाव प्राथमिक आरोग्य केंद्राची रुग्णवाहीका आजारी

    April 17, 2026

    शॉर्ट सर्किटमुळे मक्याच्या पिकाला आग

    April 17, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.