लोकशाही न्यूज नेटवर्क
मुंबई : श्रीकांत शिंदे फाऊंडेशनच्या सामाजिक कार्याचा राजकीय गाजावाजा सुरू असतानाच ठाकरे गटाचे नेते संजय राऊत यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहून श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या संशयास्पद आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी केली आहे. श्रीकांत शिंदे फाउंडेशन अंतर्गत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांसाठी आणि या उपक्रमांवर आतापर्यंत झालेल्या खर्च करण्यात आलेल्या निधीचा स्रोत नेमके काय आहे? असा प्रश्न राऊतांनी उपस्थित करत याची चौकशी व्हावी असे म्हटले आहे.
श्रीकांत शिंदे फाउंडेशनला कोट्यावधी रुपये कोण देत आहेत? ही माहिती मिळणे गरजेचे आहे असे संजय राऊत यांनी पत्रात म्हटलं आहे. धर्मदाय आयुक्त या संदर्भात चौकशी करावी, अशा प्रकारची तक्रार वकील नितीन सातपुते यांनी धर्मदाय आयुयांकडे केली आहे. मात्र एक महिना उलटूनही या तक्रारीची कुठल्याही प्रकारे दखल घेतली जात नसल्याचे आणि माहितीच्या अधिकारात ही सगळी माहिती दिली जात नसल्याचा संजय राऊत यांनी पत्रात म्हटले आहे.