कन्यादान आणि रक्तदान करुन आदर्श विवाह सोहळा संपन्न

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती;  जिल्ह्यातील एकदरा या गावी शिवहरीपंत राऊत यांच्या कुटुंबाने 25 मार्च 2022 रोजी विवाह सोहळ्यात रक्तदान शिबिराचे  आणि ग्रामीण भागात आदर्श विवाह सोहळा चे आयोजन करून नवीन पायंडा तयार केला.

चि.नितीन शिवहरीपंत राऊत या शेतकरी युवकाने सौ.अपर्णा विश्वासराव पावडे या घटस्फोटित युवती सोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.तिला एक मुलगी सुद्धा आहे.शेतकरी नवरा सौ. अपर्णाने स्वीकारून नव्याने संसार मांडण्याचा निर्णय घेताना या विवाहात आंदण, अहेर बांड बाजा,फटाके, डान्स आणि इतर श्रीमंतीचे प्रदर्शन केल्या पेक्षा रक्तदान शिबिर घेण्याची अट ठेवली आणि ग्रामीण भागात कन्यादान सोबत रक्तदान ही संकल्पना अमलात आणली.

यासाठी सर्व्हन्ट आॅफ इंडीया सोसायटीचे  चे सदस्य प्रवीणकुमार राऊत यांनी पुढाकार घेऊन वरुड तालुक्यातील रक्तदाता संघ व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. पोतदार यांच्या चमूने सहकार्य केले.सर्वप्रथम प्रवीणकुमार राऊत आणि सौ.कल्याणी राऊत या दांपत्याने रक्तदान करून या पाठोपाठ तब्बल 25पेक्षा जास्त वर्हाडी मंडळीने रक्तदान केले.यात आजी माजी सरपंच सोबत गावकरी युवक सुद्धा सहभागी होते.

भूषण ठाकरे, हेमंत नागमोते, डॉ.सुधाकर राऊत निलेश गायधने, छोटू चंदेल,गणेश चंदेल, सचिन राऊत,रवींद्र ठाकरे सहित गावकऱ्यांच्या सहकार्याने हा आदर्श विवाह सोहळा पार पडला. ज्योतिर्विंद टी संजय पाटील यांनी या विवाह सोहळ्याला आशीर्वाद देऊन आभार व्यक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.