वर्‍हा येथील विद्युत कार्यालयाच्या भोंगळ व मनमानी कारभारामुळे नागरिक त्रस्त

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती;  जिल्ह्यातील  तिवसा तालुक्यातील वर्‍हा येथील विद्युत महावितरण कार्यालयाचा भोंगळ व मनमानी कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून येथील विद्युत महावितरण च्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या ढिसाळ नियोजनामुळे वर्‍हा येथील शेतकऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असून विजेअभावी परिसरातील उन्हाळी पिके सुकण्याच्या मार्गावर आहे.

वर्‍हा शेत शिवारातील विद्युत पुरवठा सतत बंद राहत असल्याने. परिसरातील शेतकरी 5 एप्रिल रोजी दुपारी दीड वाजताच्या सुमारास तक्रार देण्याकरीता स्थानिक विद्युत महावितरण कार्यालयात गेले असता. कार्यालयाला चक्क कुलुप लागलेले होते. कार्यालयात एकही कर्मचारी हजर नव्हता. तक्रार देण्याकरीता तक्रार पुस्तिका सुद्धा उपलब्ध नव्हती .संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना फोन केले असता फोन सुद्धा उचलत नाही. महावितरणच्या एकही कर्मचारी स्थानिक वास्तव्यास नाही.

सर्व कर्मचारी बाहेर गावावरून ये-जा करतात त्यामुळे तक्रार करायची कुठे? असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला असून त्यामुळे महावितरण विभागाच्या विरोधात नागरिकांमधून रोष व्यक्त केला जात आहे .सध्या वाढत्या उन्हाचा प्रभाव लक्षात घेता उन्हाळी पिकांना किमान दोन दिवसात तरी पाणीपुरवठा होणे आवश्यक आहे. परंतु शेतातील विद्युत पुरवठा सतत बंद राहत असल्याने उन्हामुळे पिके करपत आहे.

सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने विद्युत पुरवठा सुरळीत सुरू ठेवणे गरजेचे आहे. परंतु महावितरणच्या  ढिसाळ नियोजनामुळे परिसरातील वीज पुरवठा वारंवार खंडीत होत असल्याचे प्रकार घडत आहेत. वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी घडत असलेला प्रकार त्वरित थांबविल्यास नागरिकांचा उद्रेक होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

याबाबतची लेखी तक्रार तिवसा येथील उपविभागीय अभियंता  कार्यालय येथे देणार असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी केली.यावेळी वर्‍हा येथील हेमंत शिरपूरे , शरद बोरकर , प्रवीणगहुकार, शाहरुख शाह, विजय टाले, सचिन मेहरे, कीशोर लोखंडे , सोमेश्वर टिंगणे , नितेश राऊत, अंकुश बहातकर , विशाल माळोदे , प्रकाश इंगोले  सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.