अल्पवयीन मुलीला फुस लावुन पळवून नेण्याच्या खोट्या आरोपातून आरोपीची निर्दोष मुक्तता

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

अमरावती ; सदर घटनेची तक्रार देणारी, अल्पवयीन पीडित मुलीची आई हिने आरोपी विरुद्ध तक्रार दिली होती . त्यात फिर्यादी ह्या 2017 मध्ये अमरावती येथे भाड्याच्या घरात राहत होत्या . फिर्यादी आणि

तिच्या दोन मुली प्लास्टिकच्या कारखान्यात मजुरीचे काम करत होत्या.

यामध्ये,घटनेची पार्श्वभूमी अशी होती कि , १८.०४.२०१७ रोजी, संध्याकाळी  जेव्हा पीडित मुलगी संद्याकाळ होऊन सुद्धा घरी परतली नाही म्हणून फिर्यादी आई आणी पीडीतेच्या वडिलांनी शोध घेतला असता पीडित मुलगी घरात व आजुबाजुला न सापडल्याने,शेवटी त्यांना असे कळाले की तिचे कोणीतरी अपहरण केले होते.

या तक्रारीवरून योगेश नंदू सोळंके यावर पोक्सो चे कलम 12 व भा. द. वी. चे कलम 363 लावण्यात आले. वरील प्रकरणात सरकारी पक्षाकडून 6 साक्षीदार तपासण्यात आले.  आरोपी योगेश नंदु सोळंके पक्षाकडून ऍड. श्रीकांत ग. पवार व ऍड. निखिल ल. बावणे यांनी  सक्षम बाजू मांडत जिल्हा सत्र न्यायालयाने आरोपी यांस वरील गुन्ह्यातून निर्दोष मुक्त केले.

Leave A Reply

Your email address will not be published.