Friday, September 30, 2022

अमळनेर येथून अल्पवयीन मुलीला फूस लावून पळविले

- Advertisement -

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

- Advertisement -

१७ वर्षीय अल्पवयीन मुलीला अमळनेर येथून पळवून नेल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी एकावर अमळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

- Advertisement -

पुणे जिल्ह्यात एका गावात १७ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबियांसह राहते. अमळनेर येथे तिचे बारावीची परिक्षा असल्याने मुलगी ही आई भाऊसह अमळनेर येथे मामाच्या घरी आले होते. ६ फेब्रुवारी रोजी मध्यरात्री पुणे येथील राहणारा रावसोहब पांडूरंग साळुंखे याने अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेले.

याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने अमळनेर पोलीसात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अमळनेर पोलीस ठाण्यात संशयित आरोपी रावसाहेब पांडूरंग साळुंखे याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार विलास पाटील हे करीत आहे.

 

 

- Advertisement -
spot_imgspot_img

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

हे वाचायलाच हवे

संबंधित बातम्या