समीर वानखेडेंना मोठा दणका

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचा किंग शाहरुखच्या मुलाला क्रूझवरील रेव्ह पार्टीत अटक केल्या प्रकरणानंतर वादात सापडलेल्या एनसीबीचे माजी मुंबई संचालक समीर वानखेडेंना जबर दणका बसला आहे.

नवी मुंबईतील वाशी येथे समीर वानखेडे यांच्या नावावर एक रेस्ट्रो बार आहे. या रेस्ट्रो बारचे नाव सद्गुरू असून, उत्पादन शुल्क विभागाच्या माहितीनुसार, या बारसाठीचा परवाना २७ ऑक्टोबर १९९७ मध्ये देण्यात आला होता. या बारचे लायसन ३१ मार्च २०२२ पर्यंत वैध आहे. यावरूनच नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर निशाणा साधला होता. आता य़ा बारचे लायसन ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी रद्द केले आहे. यासाठी समीर वानखेडेंच्या जन्मतारखेत म्हणजेच वयामध्ये विसंगती असल्याचे कारण देण्यात आले आहे.

यासंदर्भात समीर वानखेडे यांनी स्पष्टीकरण दिले होते. भारतीय महसूल सेवेमध्ये (आयआरएस) रुजू झाल्यापासून हा परवाना आपल्या नावे आहे. या परवान्यासंदर्भातील कायदेशीर हक्क हे समीर यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्याकडे देण्यात आले आहेत. यात बेकायदेशीर असे काहीच नाही. सेवेमध्ये रुजू झाल्यापासून म्हणजेच २००६ पासून या बार आणि रेस्टॉरंटचा उल्लेख माझ्या वार्षिक स्थावर मालमत्तेमध्ये करत आहे. तसेच या परवान्याबद्दलचाही उल्लेख संपत्तीच्या हिशोबात दिला आहे. या उद्योगामधून मिळणाऱ्या कामाईचा सर्व उल्लेख प्राप्तीकर परताव्याच्या कागदपत्रांमध्ये केला आहे, असे समीर वानखेडे यांनी म्हटले होते.

Leave A Reply

Your email address will not be published.