अमळनेर नगरपालिका स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातून ५ वी

0

जळगाव ;- राज्यातील स्वच्छ सर्वेक्षणात अमळनेर नगरपालिका ५ वि आली असून जिल्ह्यातून पहिली ठरली आहे. राज्यातील स्वच्छ सर्व्हेक्षण २०२३ घेण्यात आले असून लोणावळा नगरपालीका प्रथम ,द्वितीय कराड नगरपालिका, तृतीय सिल्लोड नगर पालिका चौथी उमरेड आणि पाचवी अमळनेर नगरपालिका ठरली असून स्वच्छ सर्व्हेक्षणात पात्र ठरलेल्या नगरपालिकां ५० हजार ते १ लाख लोकसंख्या असलेल्या नागरपालिकांचा यात समावेश आहे.

जिल्ह्यातील भुसावळ, चाळीसगाव, चोपडा, अमळनेर, भडगाव, धरणगाव, एरंडोल, फैजपूर, पाचोरा, सावदा, यावल, पारोळा, रावेर व वरणगाव या नगरपालिकांना ओडईएफ प्लस प्लसचा दर्जा मिळाला आहे.‌अशी माहिती सहायक आयुक्त (नगरपालिका)‌ जनार्दन पवार यांनी दिली आहे.

“स्वच्छता सर्वेक्षण कामगिरीत सुधारणा झाली आहे. पुढील वर्षी नगरपालिकांच्या कामगिरीत अजून सुधारणा होण्यासाठी निकालाचे नगरपालिकानिहाय विश्लेषण केले जाईल. यानुसार सखोल नियोजन आराखडा तयार करून आवश्यक निधी व मनुष्यबळ प्रत्येक नगरपालिकेला उपलब्ध करून दिले जाई‌ल.एक वर्ष प्रचंड मेहनत घेऊन पुढील वर्षी चांगला निकाल लागेल,‌यासाठी आपण प्रयत्न करणार आहोत.” अशी प्रतिक्रिया जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी व्यक्त केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.