यूट्यूब इंडियाला नोटीस, पॉक्सो कायद्याचे झाले उल्लंघन

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

व्हिडिओ ब्रॉडकास्टिंग प्लॅटफॉर्म यूट्यूबच्या भारतातील युनिटसमोर मोठ्या अडचणी आहे. राष्ट्रीय बाल हक्क संरक्षण आयोगाने चक्क पॉक्सो कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप करत युट्यूब इंडियाला नोटीस पाठवली आहे. एनसीपीसीआरचे प्रमुख प्रियंक कानूनगो यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले, की यूट्यूबवर सध्या असे हजारो व्हिडिओ उपलब्ध आहेत, ज्यामध्ये आई आणि अल्पवयीन मुलगा एकमेकांना लिपलॉक किस करत आहे. अशा प्रकारच्या व्हिडिओंच व्यावसायिकरण करणेम्हणजे पॉर्नला चालना देणं आहे. त्यामुळेच यूट्यूबला नोटीस पाठवण्यात आली आहे.

“अशा प्रकारच्या व्हिडिओंच्या माध्यमातून लहान मुलांना अब्यूज केलं जातं. अशा प्रकारचे अश्लील व्हिडिओ हे किशोरवयीन मुलांमधील उत्तेजनांना चालना देत आहे. भारतात हे चालणार नाही. यूट्यूबला यावर कारवाई करावीच लागेल”, असंही प्रियंक पुढे म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.