‘मोठ्या आवाजात बोलू नका’ म्हणत झाले असे काही…

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

डोंबिवलीत एक धक्कादायक प्रकार घडला आहे. सोसायटी मीटिंगमध्ये मोठ्या आवाजात बोलू नका सांगितल्याचा राग मनात धरून एका कुटुंबाला मारहाण करण्यात आली. एवढाच नव्हे तर, त्यांची गाडीही फोडण्यात आली आहे. या प्रकारामुळे एकाच खळबळ माजली आहे. सदानंद सालियन असे मारहाण झालेल्या तक्रारदाराचे नाव असून रोहित पाटील व उजाला पाटील असे मारहाण करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. मारहाणीची ही घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

नक्की कशावरून वाद झाला?

मिळालेल्या माहितीनुसार डोंबिवली पूर्व येथील चोळेगाव परिसरात एका इमारतीत सदानंद सालियन हे मागील १० वर्षांपासून राहतात. अलीकडेच त्यांनी इमारतीचे सचिव पद स्वीकारले होते. मागील चार महिन्यांपासून इमारतीतील पाण्याची अडचण जाणवत होती. त्याच मुद्द्यावरून ६ जानेवारीला इमरतीच्या टेरेसवर एक मिटिंग चालू होती. या मीटिंगमध्ये त्याच इमारतीत एका फ्लॅटचे मालक रोहित पाटील, उजाला पाटील आणि अमृता पाटील हे तिघेही उपस्थित होते. मीटिंगमध्ये चर्चा सुरू असताना, अमृता यांनी मोठ्या आवाजात बोलत हस्तक्षेप केल्याने सदानंद यांनी त्यांना रोखले व तुम्ही सदस्य नसल्याने उगाच गोंधळ घालू नका असे सांगितले.

यावरून उजाला यांना राग आल्याने सदानंद यांच्याशी वाद घालण्यास सुरुवात केली. काहीच क्षणात त्याचे हाणामारीत रूपांतर झाले. मग रोहित पाटील यांनीही सदानंद सालियन व त्यांच्या कुटुंबाला मारहाण करण्यास सुरुवात केली. इतकेच नाही तर त्याला त्याचा राग न आवरल्याने रोहित याने चक्क त्याने मोठा बांबू घेतला आणि इमारतीत उभी असलेल्या सदानंद यांच्या गाडीचे नुकसान केले. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली. प्रकरणात रामनगर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन पोलिसांनी पंचनामा करत रोहित पाटील, उजाला पाटील व अमृता पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.