नरेंद्र मोदींची भूमिका साकारणार अमिताभ बच्चन !

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) सध्या चर्चेत आहे. त्यांचा प्रोजेक्ट के हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. तर दुसरीकडे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांच्या बायोपिकमध्ये मुख्य भूमिकेत झळकणार असल्याची चर्चा आहे. तसेच ‘कौन बनेगा करोडपती’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून सध्या ते भेटीला ये आहे.

‘टॉयलेट : एक प्रेम कथा’ आणि ‘परी’ सारख्या सिनेमांची निर्मिती प्रेरणा अरोरा हिने केली असून, तिचा आगामी सिनेमा पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या जीवनावर चित्रित करण्यात येणार आहे. सोबतच नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत झळकणार आहे. नरेंद्र मोदी यांच्या भूमिकेला अमिताभ बच्चन योग्य तो न्याय देतीलच, त्यामुळे कदाचित प्रेरणानं त्यांची अचूक निवड केली आहे. नरेंद्र मोदी यांच्या बायोपिकमध्ये त्यांच्या आयुष्यातील अनेक पैलूंचा समावेश बघायला मिळणार आहे. परराष्ट्रीय धोरणाचा पाठपुरावा, देशाचा आर्थिक विकास ते कोरोनासारख्या आजाराचा केलेला सामना, अशा अनेक गोष्टींचा उलगडा होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.