घृणास्पद; नराधम बापानेच केला मुलीवर अत्याचार

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

सावत्र बापानेच आईला मारण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना शहरातील गांधालीपूर भागात घडली. नराधमाने पीडित मुलीच्या आईशी दुसरा विवाह केला होता. दीड वर्षांपासून तो, पीडित मुलगी, तिची बहीण व आई असे सर्व एकत्र राहत असे. रात्रीच्या वेळी तो पीडित मुलीच्या जवळ येऊन तिच्या सोबत अश्लील हावभाव करत असे. मुलीने विरोध केल्यानंतर तिला व तिच्या आईला मारण्याची धमकी देत असल्याने मुलगी भीतीपोटी सहन करीत होती. २३ एप्रिलला तसेच १५ जुलैला विनाकारण भांडण झाल्यावरून त्याने आपल्या सावत्र मुलीवर बळजबरी अत्याचार केला. १९ ला मुलीची आई तिच्या आजीसोबत बाहेरगावाहून आल्यानंतर अखेर मुलीने सर्व सत्य सांगितले.

अमळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून नराधम बापाविरुद्ध पोक्सो कायदा व बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्यासह सहायक पोलिस निरीक्षक हरिदास बोचरे तपास करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.