वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

सध्या जिकडे तिकडे जंगल कटाई होत असल्याने वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढला आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा शहरात मागील अनेक दिवसांपासून एक माकड मानवी वस्तीत आल आहे. या माकडाला जेव्हा कधी भुक लागते तेव्हा कुठेही जाऊन आपली भुक शमविण्यासाठी कोणत्याही हॉटेलमध्ये किंवा रस्त्यांवरील एखाद्या खाद्यपदार्थ किंवा भाजीपाल्याच्या लोटगाडी वर जाऊन बसतो. व भुक शमे पर्यंत ताव मारतो. अनेक जण या माकडाला हाकलत नाही तर, काही न काही खाद्य पदार्थ देऊन त्याला मदत करतात. आज सकाळपासून ह्या माकडाने बाजारपेठेत आपला मोर्चा वळवला आहे. सकाळी शनी मंदिराजवळ या वानराचा वावर दिसला तर, काही वेळाने मुख्य बाजारपेठेत या वानरांचे दर्शन झाले त्यानंतर दुपारी या माकडाने बाजारपेठेत धुमाकूळ घातला. एका नंतर एक भाजीपाल्याच्या लोटगाडी वर ताबा मिळवत, भाजीपाल्यावर ताव मारला. तर काहींनी या माकडा पासून सावध राहण्याचा सुचना देखील केल्या. तसेच वनविभागाला बोलवुन माकडाला त्यांच्या स्वाधीन करण्याचेही सांगितले. जंगल नष्ट होत असल्यामुळेच या वन्य प्राण्यांचा मानवी वस्तीत वावर वाढलेला मात्र दिसत आहे. यात किती फायदा किती नुकसान हा येणारा काळच ठरवेल.

Leave A Reply

Your email address will not be published.