दिल्ली विमानतळावर कस्टमची सर्वात मोठी कारवाई, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

कस्टम विभागाला दिल्ली विमानतळावर तस्करीच्या हेतूने नेला जाणारा परदेशी चलनी नोटांचा आतापर्यंतचा सर्वात मोठा साठा सापडला आहे. कस्टमच्या अधिकाऱ्यांनी तपासणी करतांना ताजिकिस्तानच्या ३ व्यक्तींकडून ७,२०,००० डॉलर आणि ४,६६,२०० रुपये जप्त केले आहेत.

याची किंमत एकूण १० कोटी रुपये सांगण्यात येत आहे. सध्या तिन्ही तस्करांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. कस्टम विभागाने नोटांचा हा साथ टर्मिनल ३ येथून जप्त केला. कस्टम विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं की, हे आरोपी जेव्हा इस्तंबूलच्या विमानात बसणार होते, तेव्हा त्यांना अटक करण्यात आली.

अधिकाऱ्यांनी सांगितले की, इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल ३ येथे ताजिकीस्थानच्या या ३ आरोपींना विदेशी चाळणी नोटांसह अटक करण्यात आली. भारतामध्ये सापडलेला विदेशी नोटांचा इतका मोठा साथ या आधी सापडला नव्हता. एका वरिष्ठ सीमा शुल्क अधिकाऱ्याने सांगितलं की अटक केलेल्या तिघांमध्ये एका किशोरवयीन मुलाचाहीसमावेश आहे. सापडलेल्या नोटा सामानाच्या आत ठेवलेल्या बुटांमध्ये लपविण्यात आली होती.

ताश्कंद येथून आणलेलं ८ कोटींचं सोन जप्त
१३ जुनला इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर सोन्याचा आतापर्यंतची सर्वात मोठा साठा पकडण्यात आला होता. हे सोनं उझबेक नागरिक सोन्याच्या अलंकारांच्या स्वरुपात घेऊन आली होती. तीची झडती घेतल्यानंतर तिच्याकडून १६.५७० किलो सोनं जप्त करण्यात आलं होतं.

आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या सोन्याची किंमत जवळपास ८.१६ कोटी इतकी सांगण्यात येत आहे. या प्रकरणामध्ये आजी-नातीला अटक करण्यात आली आहे. अधिकाऱ्यांना या दोघींपैकी एकीला सहज पकडण्यात यश आलं.

Leave A Reply

Your email address will not be published.