‘सीमा हैदर’ प्रकरणी घरमालकाने केला ‘हा’ खुलासा, वाचा सविस्तर

0

लोकशाही न्यूज नेटवर्क

पाकिस्तानात राहणारी सीमा हैदर (Seema Haider) आणि सचिन मीणा (Sachin Meena) यांनी नेपाळमध्ये लग्न केला. आणि ती आता आपल्या चार मुलांसह भारतात वास्तव्यास आहे. या जोडप्याच्या प्रेमप्रकरणाची चर्चा सद्या जोरदार सुरु आहे. सोबतच भारतात घुसखोरी कारण किती सोप आहे. यावरही प्रश्न निर्माण केले जात आहे. पाकिस्तानी नागरिक असलेल्या सीमाला यूपी एसटीने ताब्यात घेतलं आहे. त्या चौकशीत तिने सचिनवर मनापासून प्रेम करत असल्याची कबुली दिली आहे. तसेच पाकिस्तानात परत जाणार नसल्याचे सुद्धा तिच्याकडून सांगण्यात आले आहे. आतापर्यंत सीमा आणि सचिनच्या प्रेमाची चर्चा होत असताना त्यांच्या घरमालकाने धक्कादायक खुलासा केला आहे. सचिन पाकिस्तानी असलेल्या सीमाला मारहाण करायचा, असं त्यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाला घरमालक ?
मीडिया रिपोर्टनुसार “घरमालकाचं म्हणणं म्हणणं आहे कि, सीमा आणि सचिनमध्ये कधी कधी वाद व्हायचे. सिमला बिडीचे व्यसन आहे. सचिन तिला व्यसन न करण्यास सांगत होता. पण ती त्याचे एक ऐकत नव्हती. म्हणून सचिन तिला मारहाण करायचा.

सीमाकडून पोलिसांनी ६ पासपोर्ट जप्त केले आहे. पास्पोर्टबाबत चौकशी केली असता तिने सांगितले की, “नेपाळचा व्हिजा घेण्यासाठी सीमा गुलाम हैदर नावाने अर्ज केला होता. व्हिजा न मिळाल्याने पुन्हा सीमा नावाने अर्ज केला. तसेच हॉटेलमध्ये सचिनने सीमा पत्नी असल्याचं सांगत रम बुक केला होता.

Leave A Reply

Your email address will not be published.