अतिदुर्गेम गुजरदरी या गावाची काया पालट, गावाला मिळणार पक्का रस्ता

0

चाळीसगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

गेल्या अनेक वर्षांपासून दूरलक्षित गजरदरी गावाकडे आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी लक्ष वेधले. आमदार मंगेश चव्हाण (Mangeshdada Chavan) यांच्या निर्देशानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार रस्त्याची मागणी केली व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरु आहे.

गावातील विविध विकासकामांसाठी ७० लाखांचा निधी मंजूर
चाळीसगाव तालुक्यातील शेवटच्या टोकाला ५० किमी अंतरावर असणाऱ्या अतिदुर्गम भागातील गुजरदरी गावाच्या विकासाचा विषय नेहमीच चर्चेचा राहिला आला आहे. चाळीसगावहून गुजरदरी जाण्यासाठी नाशिक जिल्ह्याच्या नांदगाव तालुक्यातुन जातेगाव मार्गे औरंगाबाद जिल्ह्याच्या कन्नड व वैजापूर तालुक्याच्या सीमेवरून जवळजवळ ५५ किमी प्रवास करावा लागतो. साधा रस्ता व मुलभूत सुविधांचा अभाव असणाऱ्या गुजरदरी गावाने आजपर्यंत अनेक लोकप्रतिनिधी पाहिले, अनेक आश्वासने बघितली, मात्र त्यांच्या विकास होईल असे चित्र मात्र गावात नाहीये.

मात्र चाळीसगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्या माध्यमातून गुजरदरी गावाला ७० लाख रुपयांचा केवळ निधी मंजूरच केला नाही. तर त्यांच्या निविदाप्रक्रिया देखील झाल्या आहेत. गावाचा सर्वात महत्वाचा असणारा गुजरदरी हून लोढरे गावाकडे जाणाऱ्या रस्त्याच्या मजबुतीकरण कामासाठी ५० लाख रुपये, गावांतर्गत रस्ता सुधारणा करण्यासाठी १० लाख रुपये, गावात सभामंडप उभारण्यासाठी १० लाख रुपये आदी कामांचा समावेश आहे.

सद्यस्थितीत रस्त्याची भयानक दुरवस्था झाली असून पायी चालताही येणार नाही अशी परिस्थिती आहे, याबाबत सोशल मिडीयावर व्हिडीओ देखील व्हायरल झाला होता, मात्र त्यापूर्वीच आमदार मंगेशदादा चव्हाण यांनी आपल्या दूरदृष्टी व नियोजनातून गावासाठी रस्त्याची तरतूद करून ठेवली होती. पावसाळा सुरु असल्याने कामाला सुरुवात करता येत नव्हती मात्र, आता गावाच्या मागणीनुसार त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी व सबंधित ठेकेदार यांना तात्काळ रस्त्याची पाहणी करण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता सुपले व हेमंत चौधरी तसेच कंत्राटदार शिरसाठ यांनी ग्रुप ग्रामपंचायत सरपंच नितीन पाटील व गावकऱ्यांसोबत रस्त्याची पाहणी केली. त्यामुळे लवकरात लवकर कामाला सुरुवात होणार असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. विशेष म्हणजे अनेक दशकानंतर प्रथमच गुजरदरी गावाला जवळपास २ किमी हून अधिक रस्ता तयार करून मिळणार आहे. यासोबतच ठक्कर बाप्पा आदिवासी विकास योजनेतून पेव्हर ब्लॉक बसविण्यासाठी ५ लाख रुपये, ब्लोक, अंगणवाडी बांधकामासाठी रोजगार हमी योजनेतून ११ लाख रुपये असा निधी मंजूर आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.