मेहुणबारे तेथील तोतया वन अधिकाऱ्याला अटक, वाचा सविस्तर

0

मेहुणबारे, लोकशाही न्यूज नेटवर्क

चाळीसगाव (Chalisgaon) तालुक्यातील मेहुणबारेयेथील एका गावात वनविभागात सीसीएफ असल्याची बतावणी करीत जामदा येथे शाळेत मुलांना वाया वाटपासाठी आलेल्या तोतया वन अधिकाऱ्याला गजाआड केले आहे. या प्रकरणी मेहुणबारे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

सूत्रांनुसार, चाळीसगाव तालुक्यातील जामदा येथील माध्यमिक विद्यालयात मुलांना वह्या वाटपाच्या कार्यक्रमास वन अधिकारी आलेले आहे. त्यावरून नागराळे यांना शंका आल्याने त्यांनी ही बाब मेहुणबारे पालिसांच्या कानावर घातली. व या ठिकाणी वन विभागाच्या कार्यालयात असलेले सी. व्ही.पाटील, जी. एस पिंजारी, राहुल पाटील, एम. पी. शिंदे यांनी घटनास्थळी गेले असता, मेहूणेबारे पोलीस थानायचे कर्मचारी पोहोचले. याबाबत अधिक चौकशी केली असता हा तोतया वनअधिकारी नितीन रवींद्र पगारे रा. बहाळ ता. चाळीसगाव असल्याचे निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.