रुग्णवाहिका चालकांचे ‘ग्रहण’ सुटेना!

0

वरिष्ठांनी दुर्लक्ष केल्याने उपासमारीची वेळ : ठेका रद्द करा

जळगाव ;– जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या 102 रुग्णवाहिका चालकांचे मानधन गेल्या पाच महिन्यांनासून रखडले असून त्यासंदर्भात जिल्हा शल्सचिकित्सकांना निवेदन देवूनही त्यावर तोडगा न निघाल्याने चालकांनी आरोगय भवन मुंबर्इ येथे सहसंचालक (तांत्रिक) राष्ट्रीय आरोग्य अभियान यांची भेट घेवून त्यांना निवेदन दिले असून त्वरीत समस्या सोडवा अन्यथा ठिय्या आंदोलन करण्यात येर्इल असा इशारा दिला आहे.

जिल्हातील रुग्णवाहिका चालक आपल्या हक्काच्या पैशांसाठी शासन दरबारी खेटे मारत असतांनाही त्याकडे दुर्लक्ष होत असल्याने चालक चांगलेच संतापले आहेत. ठेकेदाराच्या मनमानीमुळे चालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून हा ठेका रद्द करावा अशी मागणी चालकांनी केली आहे. येत्या चार दिवसात तोडगा निघाला नाही तर परिवारासह ठिय्या आंदोलन करण्यात येर्इल असा इशारा देण्यात आला आहे. मुंबर्इ येथील राजछाया इनोव्हेटिव्ह कंपनीकडे जिल्ह्यातील 25 रुग्णवाहिकांचा ठेका दिला असून संबंधीत ठेकेदार चालकांना हक्काचे पैसे देण्यास टाळाटाळ करीत आहे. सदर ठेका रद्द करुन तो जिल्हा रुग्णालयाकडून चालविण्यात यावा व थकीत मानधन देण्यात यावे अशी मागणी नितीन तायडे, विजू चेरे, मिलिंद तायडे, कुर्बान तडवी, प्रवीण ठाकूर, अशोक बडगुजर, विजू पांढरे, कुणाल कोळी, योगेश कोळी, गजानन बारी, गौरव जाधव, मनोज पाटील यांच्यासह चालकांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.