चोपडा, लोकशाही न्यूज नेटवर्क
जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथे कुंटणखान्यावर धाड टाकत पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या धाडीत तब्बल साठ महिलांना ताब्यात घेतले आहे. यात ५ दलाल, १० मालकीण महिलांसह एकुण साठ महिलांना ताब्यात घेतल्या आहेत. चोपडा येथील नविन तहसील कार्यालयाच्या मागील बाजूस असलेल्या झोपड्यांमधे देहविक्रीचा व्यवसाय अनेक महिन्यांपासून सुरु होता अशी माहिती मिळाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत ताब्यात घेतलेल्या महिलांमध्ये देहविक्री करणा-या आणि करण्यास भाग पाडणा-या यासह बहुतांश महिला या पर राज्यातील आहेत.ताब्यात घेण्यात आलेल्या या महिला नेपाळ, पश्चिम बंगाल, मुंबई, आंध्रप्रदेश आदी ठिकाणच्या आहेत.
उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. कुणाल सोनवणे यांच्या आदेशानुसार पोलिस निरीक्षक मधुकर साळवे आणि त्यांच्या पथकाने या कारवाईत सहभाग घेतला. पिडीत महिलांना महिला सुधारगृहात पाठवले जाणार असून कुंटणखाना चालवणा-या महिलांविरुद्ध गुन्हा चोपडा शहर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.