धक्कादायक; मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर रुग्णवाहिकेत स्फोट… एक महिला ठार…

0

 

रायगड, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

रायगडममधून एक वाईट बातमी समोर येत आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर खोपोली हद्दीत रुग्णवाहिकेत स्फोट झाल्याने रुग्णवाहीका जळून खाक झाली तर त्यात एका महिलेचा मृत्यू झाल्याचे सामोर आले आहे.

मिळालेल्या अधिक माहितीनुसार रुग्णवाहिका एका महिला रुग्णाला घेऊन मुंबईहून पुण्याच्या दिशेने निघाली होती. यावेळी पुणे लेनवर असताना रुग्णवाहिका बंद पडली. चालकाने बिघाड दुरूस्त करण्याचा प्रयत्न केला. मात्र रुग्णावाहिका काही दुरुस्त होऊ शकली नाही. त्यामुळे रुग्णवाहिकेतील रुग्ण महिलेसह अन्य व्यक्तींना खाली उतरवण्यात आले. रुग्णवाहिकेतून सर्वजण खाली उतरल्यावर अचानक गाडी रिवर्स जाऊ लागली. रिवर्स गेल्यानंतर थोड्या अंतरावर जाऊन या रुग्णवाहिकेचा भीषण स्फोट झाला. यामध्ये उपचार वेळेवर न मिळाल्याने रुग्ण महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला.

अपघात झाला तेव्हा पुणे लेनवर मोठी वाहतूककोंडी झाली होती. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. महिलेला दुसऱ्या नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासनीअंती महिलेचा आधिच मृत्यू झाल्याचे सांगितले. रुग्णवाहिकेला लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाची वाहने देखील घटनास्थळी दाखल झाली होती. मात्र तोपर्यंत रुग्णवाहिकेचा जळून कोळसा झाला होता.

मिळालेल्या माहितीनुसार, ॲम्बुलन्समधील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट झाल्यामुळे रुग्णवाहिकेत आग लागली. त्यामध्ये सुदैवाने पोलीस कर्मचारी आणि बचाव दलातील सदस्य बचावले मात्र एका पोलीस कर्मचाऱ्याची दुचाकीही यात जळून खाक झाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.