ईव्हीएममध्ये फेरफार प्रकरण – दानवेंकडे मागितले अडीच कोटी

0

लोकशाही न्युज नेटवर्क –
मतदान प्रक्रियेत ईव्हीएममध्ये फेरफार करण्यासाठी शिवसेनेचे (यूबीटी) नेते अंबादास दानवे यांच्याकडून अडीच कोटी रुपयांची मागितला असल्याचा प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी छत्रपती संभाजीनगर शहरात एका लष्करी जवानाला पोलिसांनी अटक केली आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.

“मारुती ढाकणे (४२) या आरोपीने इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीनमध्ये चिपच्या माध्यमातून फेरफार करण्यासाठी पैसे मागितल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते दानवे यांनी केला. याप्रकरणी त्यांनी पोलिसांकडे लेखी तक्रार दाखल केली”, असे एका पोलीस अधिकाऱ्याने मंगळवारी सांगितले. “आरोपीच्या डोक्यावर कर्ज होतं. हे कर्ज फोडण्यासाठी त्याने पैशांची मागणी केली आहे. पण त्याला ईव्हीएमबद्दल काहीच माहिती नाही, असे पोलिसांनी सांगितले. मंगळवारी दुपारी चारच्या सुमारास आरोपीने अंबादास दानवे यांचे धाकटे भाऊ राजेंद्र दानवे यांची जवळच्या हॉटेलमध्ये भेट घेतली. अंबादास दानवे यांनी दिलेल्या माहितीच्या आधारे याठिकाणी झालेल्या चर्चेनंतर दीड कोटी रुपयांचा करार झाला होता, त्याने राजेंद्र दानवे यांच्याकडून टोकन रक्कम म्हणून १ लाख रुपये घेतले”, असंही पोलिसांनी स्पष्ट केलं.

“आरोपीच्या डोक्यावर कर्ज आहे. कर्जातून बाहेर पडण्यासाठी त्याने ही युक्ती केली. त्याला मशीन (EVM) बद्दल काहीच माहिती नाही. तो चीटर असून आम्ही त्याला अटक केली आहे. येथील क्रांती चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे”, असे पोलिसांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.