ब्रह्माकुमारीज्तर्फे 20 फुटी भगवान अमरनाथ देखावा ठरले भाविकांचे आकर्षण

0

 

विविध क्षेत्रातील 88 कर्तबगार महिलांचा शिव सन्मान

जळगाव ;- : ब्रह्माकुमारीज् तर्फे महाशिवरात्री पर्वानिमित्त अनेकाविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यात 20 फुटी अमरनाथ देखावा, शिवध्वजारोहण, शिव प्रतिज्ञा व शिवमंदिरात आध्यात्मिक चित्रप्रदर्शनी यांचा समावेश आहे.

88 कर्तबगार महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन
भारतात सर्वत्र महाशिवरात्री पर्व मोठ्या भक्तिभावाने साजरे केले जाते. त्यानिमित्त ब्रह्माकुमारीज्च्या स्थानिक ढाके कॉलनी शाखेतर्फे सकाळी विविध क्षेत्रातील 88 कर्तबगार महिलांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन शिवरात्री महोत्सवाचे उदघाटन करण्यात आले. याप्रसंगी ब्र.कु. मिनाक्षीदीदींनी शिवध्वजारोहण केले. ब्र.कु. राजबहन यांनी शिवरात्रीचे आध्यात्मिक रहस्य सांगितले. संचलन ब्र.कु. वर्षा बहन व ब्र.कु. हेमलता बहन यांनी केले. तदनंतर अवगुण मुक्त, व्यसन व विकारमुक्त बनण्यासाठी शिवप्रतिज्ञा उपस्थितांना दिली गेली.

20 फुटी भगवान अमरनाथ देखावा ठरले भाविकांचे आकर्षण
शहरातील ओंकारेश्वर मंदिर प्रांगणात भव्य 20 फुटी भगवान अमरनाथची प्रतिकृती भाविकांचे विशेष आकर्षण ठरली. ओंकारेश्वर मंदिर आवारात मानव जीवन दिव्यीकरण आध्यात्मिक प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले. त्यात स्वत:चा वास्तविक परिचय, परमात्म्याची दिव्य कर्तव्य, सृष्टीचक्राचे रहस्य, मृत्यूनंतर काय? मृत्यूपूर्वी काय या सारख्या विविध आध्यात्मिक रहस्य स्पष्ट करण्यात आलीत. त्याचबरोबर राजयोगाची विधी आणि अनुभूतीही करविली जाणार आहे. असाच कार्यक्रम निमखेडी व उमाळा येथील शिवमंदिरांच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.