रेल्वे प्रवासात विसरलेली बॅग व मौल्यवान वस्तूचा शोध घेत पोलिसांनी केले प्रवाश्याच्या स्वाधीन

0

अमळनेर, लोकशाही न्यूज नेटवर्क

काल (दि. १३ फेब्रुवारी) सकाळी ९. ३० च्या सुमारास शिंदखेडा रेल्वे स्थानकावर खान्देश एक्सप्रेस (बांद्रा टर्मिनस) ट्रेनचे आगमन झाले असता त्यातुन दोन प्रवासी पती-पत्नी उतरले आणि घाई- गडबडीने घराकडे निघाले असता. अचानक रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यावर त्यांच्या लक्षात आले की, आपण आपली एक बॅग रेल्वेत विसरलो. अन त्या बॅगेत आपल्या मौल्यवान वस्तू आहेत. त्यानंतर या दाम्पत्य प्रवाशांनी पुन्हा रेल्वे स्थानकावर येऊन पाहिले व विचारणा केले. तर ट्रेन त्या स्थानकावरून पुढे अमळनेरच्या दिशेने निघाली होती.त्यांनी अमळनेर पोलीस दूरक्षेत्रशी संपर्क साधून सदरच्या घटनेची माहिती दिली.

खान्देश एक्सप्रेसचे अमळनेर स्थानकावर आगमन होताच पो.ना हेमंत ठाकूर, पो.ना हिरालाल चौधरी, पो.ना जितेंद्र चौधरी, महिला हे.कॉ. अलका अढाळे यांनी जाऊन शोध घेतला. सदर बॅग आढळून आली व ती बॅग काढून पो.स्टे ला आणली. सदर बॅगेत कपडे, चांदीचे दागिने, चांदीचे कडे असे एकूण दहा ते पंधरा हजार रुपयांच्या वस्तू बॅगेत आढळून आल्या.

प्रभारी अधिकारी सहाय्यक पो. नी रमेश वावरे यांच्या आदेशाने पी.एस.आय वाघ साहेब यांच्या हस्ते सदर प्रवाशांला आपल्या वस्तू व चांदीच्या दागिन्यांसह ती बॅग परत केले. सदर प्रवास यांनी पोलीस प्रशासनाचे आभार मानले.

Leave A Reply

Your email address will not be published.