चिंचखेड ग्रामस्थांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न रावळांच्या मध्यस्थीने मार्गी

0

लोकशाही न्यूज नेटवर्क 

मलकापूर :- तालुक्यातील हरणखेण ग्रामपंचायत अंतर्गत ग्रुप ग्रामपंचायत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या चिंचखेड या गावात दलित समाज वस्ती असून चिचखेड हे सुमारे अडीचशे लोकवस्तीचे गाव आहे. या गावाला दोन महिन्यापासून पिण्याच्या पाण्याची भीषण टंचाई असल्याने ग्रामस्थांनी ही ॲड.हरीश रावळ यांच्या कानावर घातल्याने हरीश रावळ गावात चिंचखेड गावात जाऊन हरणखेड चे सरपंच नागो राणे, उपसरपंच नंदु इंगळे, ग्रामपंचायत सदस्य राजू नेवे, गिताबाई निकम आदिंना सोबत घेऊन शेतकरी प्रकाश निना निकम यांची भेट घेतली

शेतातील विहिरीवरून प्रकाश निकम यांनी स्वखर्चाने पाणी देण्याचे कबूल केले असून आज रोजी चिंचखेड गावातील ग्रामस्थांचा पिण्याचा पाण्याचा प्रश्न तात्पुरता मार्गी लागला असून जिल्हा परिषद विभागाने तात्काळ विहीर अधिग्रहण करून किंवा दलित वस्ती सुधार योजनेंतर्गत  विहीर खोदुन स्वतंत्र पाणीपुरवठा योजना तयार करुन आगामी उन्हाळ्यातील भिषण पाणीटंचाई प्रश्न मार्गी लावण्याचे पाणीपुरवठा अभियंता विभाग नांदुरा यांना भ्रमणध्वनी द्वारे रावळ यांनी सांगितले. ग्रामपंचायत जिल्हा परिषदेकडे तसा ठराव पाठविणार असल्याचे ग्रामसेवक यांनी सांगितले आहे.

यावेळी विलास निकम,अशोक निकम, त्र्यंबक निकम, रेवती नेवे,संगीता निकम,मंगला निकम शोभा निकम, चिंधाबाई निकम, संदीप खाचणे, ललिता तायडे सह ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या.

Leave A Reply

Your email address will not be published.