अमळनेरात बनावट नोटा बाळगल्याप्रकरणी दोन जण ताब्यात

0

अमळनेर , लोकशाही न्यूज नेटवर्क

शहरातील पैलाड भागात बनावट नोट आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या संदर्भात शुक्रवारी 24 मार्च रोजी सायंकाळी सात वाजता अमळनेर पोलीस ठाण्यात २ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघांना अटक करण्यात आले आहे.

शहरातील पैलाड भागात नकली नोटा चालवण्याच्या प्रयत्नात संशयीत असल्याची माहिती मिळाल्यानंतर पथकाने कैलास शिवराम भाई (28, ईहदरी, ता.कफराड, जि.बलसाड), वसंत कालसिंग मुलकाशा (23, कावडझिरी, ता.धारणी,, जि.अमरावती) यांना अटक करण्यात आली. पथकाने भोला टेलर यांच्या दुकानाजवळून दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडे 10 हजार रुपये किंमतीच्या 500 रुपयांच्या नकली नोटा जप्त करण्यात आल्या असून संशयीतांची दुचाकी (एम.एच.27 डी.सी.7053) व दोन मोबाईल असा एकूण एक लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक अनिल भुसारे करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.