विषारी औषध घेतल्याने शेतकऱ्याचा उपचारादरम्यान मृत्यू

0

भडगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

तालुक्यातील कजगाव येथील ५० वर्षीय शेतकऱ्याने विषारी औषध घेतल्याने मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याबाबत शुक्रवार २४ मार्च रोजी भडगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. नरेंद्र भिकन पाटील (वय ५० रा. कजगाव ) असे मयत झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.

सूत्रांनी दिलेली माहिती अशी की, नरेंद्र भिकन पाटील हे कजगाव येथे शेतीचे काम करून ते आपला उदरनिर्वाह करतात. गुरुवार २४ मार्च रोजी त्यांनी शेतात असताना विषारी औषध घेतले त्यांना अत्यवस्थ वाटत असल्याने त्यांना तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. दरम्यान शुक्रवार २४ मार्च रोजी दुपारी २ वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. विषारी औषधघेण्यामागचा कारणस्पष्ट होऊ शकले नाही . या संदर्भात भडगाव पोलीस स्टेशनला मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीस नाईक नरेंद्र विसपुते पुढील तपास करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.