अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराच्या नावाची घोषणा

0

पुणे ;– रायगड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि विद्यमान खासदार सुनील तटकरे हे महायुतीचे उमेदवार असतील, अशी घोषणा अजित पवारांनी केली आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांनी पुण्यात झालेल्या पक्षाच्या बैठकीनंतर लोकसभा निवडणुकीतील उमेदवारांबाबत हि माहिती दिली आहे. तसंच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी स्वत: आणि महायुतीतील इतर घटकपक्षांचे महत्त्वाचे नेते २८ मार्च रोजी एकत्रित पत्रकार परिषद घेऊन महायुतीचे सर्व जागांवरील उमेदवार घोषित करतील, अशी माहितीही अजित पवारांकडून देण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.