ग्रा.पं.सदस्य किशोर पाटील यांनी केली उर्दू शाळा आणि कब्रस्थानची पाहणी…

0

 

ऐनपुर, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

ऐनपूर येथील ग्रामपंचयत सदस्य किशोर पाटील यांनी दि. १ एप्रिल रोजी ऐनपुर येथील जि.प.उर्दू शाळेस तसेच येथील मुस्लिम कब्रस्थान येथे भेट देऊन कामांची पाहणी केली. यासह उर्वरीत कामांची चर्चा केली.

उर्दू शाळेत जाऊन शिक्षकांसोबत शाळेबाबत, विद्यार्थ्याबाबत अडचणी जाणून घेतल्या. नवीन मंजूर बांधकाम खोली वापरा बाबत चर्चा केली, तसेच मुस्लिम कब्रस्थान येथे जाऊन पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष हैदर अली, सलमान खान, इकबाल पिंजारी, सय्यद अमजद, शिक्षक तसेच विजय एस अवसरमल, विजय के अवसरमल, बाबू शेख यांचेसह शाळेतील शिक्षक आणि इतर समाज बांधव उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.