भाजपला मोठा झटका… हा मित्रपक्ष युती आणि NDA मधून बाहेर… फटाके फोडून केला जल्लोष…

0

 

नवी दिल्ली, लोकशाही न्यूज नेटवर्क:

 

AIADMK ने NDA आघाडी सोडण्याची घोषणा केली आहे. AIADMK ने भाजपसोबतची युती तोडण्याची औपचारिक घोषणा केली. पक्षाचे उपमहासचिव केपी मुनुसामी यांनी सांगितले की, आम्ही भाजपसोबत युती करण्याचा आणि एनडीएमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे.

या घोषणेनंतर AIADMK कार्यकर्त्यांनी मुख्यालयात फटाके फोडून आनंद साजरा केला. पक्षाच्या जिल्हा सचिव, खासदार आणि आमदारांच्या बैठकीत एनडीएतून बाहेर पडण्याचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला. AIADMK आपल्या मित्रपक्षांसोबत निवडणूक लढवणार आहे. AIADMK चे म्हणणे आहे की सर्व जिल्हा सचिवांच्या एकमताने हा निर्णय घेण्यात आला आहे. AIADMK ने आरोप केला आहे की, राज्याचे भाजप नेतृत्व एआयएडीएमके नेत्यांची जाणीवपूर्वक बदनामी करत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.