दु:खद: मांजरीला वाचवताना 5 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रातील धक्कादायक घटना

0

अहमदनगर, लोकशाही न्यूज नेटवर्क 

काल  गुढी पाडव्याच्या दिवशी अहमदनगरच्या नेवासा तालुक्यातील वाकडी गावात धक्कादायक घटना घडली. मांजरीला वाचवण्याच्या नादात घराजवळच्या विहीरीत पडून पाच जणांचा मृत्यू झाला. फक्त एका व्यक्तीला वाचवण्यात यश आलं आहे. वापरात नसलेली ही विहीर गाळाने भरलेली होती. आधी एक जण उतरला, तो गाळात रुतला. मग त्याला वाचवण्यासाठी उतरलेल्या चार जणांचा गाळात रुतून मृत्यू झाला.

घरातील एक मांजर या विहीरीत पडली होती. शेण टाकण्यासाठी या विहीरीचा वापर होत होता. मांजर विहीरीत पडली म्हणून तिला वाचवण्यासाठी एक जण विहीरीत उतरला होता. टाकाऊ पदार्थ टाकण्यासाठी या विहीरीचा वापर सुरु होता.

विहीरीमध्ये पाणी नव्हतं. शेण आणि अन्य टाकाऊ पदार्थ साचून विहरीत विषारी बायोगॅस तयार झाला होता. त्यामुळे पाच जणांचा मृत्यू झाला. काल ही घटना घडली. आज पहाटेच्या सुमारास पाचही मृतदेह बाहेर काढण्यात आले. प्रशासनाकडे यंत्रणा नसल्याने मदतकार्य उशिराने सुरु झालं. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहेत. एकजण बचावला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलय. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

माणिकराव गोविंद काळे (वय ६५), संदीप माणिक काळे (वय ३६), अनिल बापूराव काळे (वय ५८), विशाल अनिल काळे (वय २३), बाबासाहेब पवार (वय ३५) वर्ष हे सहा जण शेणाचा शोषखड्डा विहिरीमध्ये अडकले होते. त्यांना काढण्याची रेस्क्यू ऑपरेशन करण्यात आले. याप्रसंगी नेवासा पोलीस स्टेशनचेपोलीस अधिकारी उपस्थित होते. या घटनेमुळं नेवासा तालुक्यामध्ये मोठी खळबळ उडाली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.