खासदार अफजल अन्सारीला ४ वर्षांची शिक्षा

0

लोकशाही, न्यूज नेटवर्क

 

२००५ मध्ये गाझीपूरमध्ये तत्कालीन भाजप आमदार कृष्णानंद राय यांच्यासह सात जणांची मुहम्मदाबाद पोलिस स्टेशनच्या बसनिया चट्टी येथे हत्या करण्यात आली होती. या प्रकरणी अफजल अन्सारी (Afzal Ansari) आणि मुख्तार अन्सारी (Mukhtar Ansari) यांच्यावर २००७ मध्ये गँगस्टर कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्याच संदर्भात आता निकाल लागला असून बहुजन समाज पक्षाचे खासदार अफजल अन्सारी यांना दोषी ठरवून चार वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. शिक्षा सुनावण्यासोबतच अफजल अन्सारी यांना कडेकोट बंदोबस्तात तुरुंगात पाठवण्यात आले.

या प्रकरणात अन्सारीला १० वर्षांची शिक्षा आणि ५ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे. शिक्षा सुनावताना ते न्यायालयात हजर होते. न्यायालयाकडून दोन वर्षांपेक्षा जास्त शिक्षा झाल्यास आमदार आणि खासदाराचे सदस्यत्व रद्द होऊ शकते.

Leave A Reply

Your email address will not be published.