पारोळा कृषी उत्पन्न बाजार समिती महाविकास आघाडीकडे

0

पारोळा, लोकशाही न्यूज नेटवर्क

 

पारोळा (Parola) तालुक्यातील मिनी विधानसभा म्हणून ओळख असलेल्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत आज मतमोजणी होऊन निकाल घोषित करण्यात आला आहे. यात महाविकास आघाडीला पुर्ण बहुमत मिळाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी की पारोळा कृषी उत्पन्न बाजार समितीची निवडणूक प्रक्रिया काल २८ रोजी पार पडली होती तर आज या निवडणुकीचा निकाल घोषित करण्यात आला आहे. आज सकाळी १० वाजेपासून हरिनाथ मंगल कार्यालयात मतमोजणीला सुरूवात करण्यात आली दुपार पर्यंत जवळपास सर्वच निकाल घोषित झाले आहे. यात विद्यमान आमदार चिमणराव पाटील यांच्या गटाला १८ पैकी फक्त ३ जागांवर समाधान मानावे लागले आहे तर महाविकास आघाडी ला १५ जागा मिळाल्या असून त्यांना पुर्ण बहुमत मिळाले आहे या विद्यमान सभापती अमोल पाटील यांचा या निवडणुकीत पराभव झाला. व मा मंत्री डॉ सतिश पाटील यांचा विजय झाला आहे, तसेच शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष डॉ हर्षल माने यांनीही विजय संपादन केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.