Close Menu
लोकशाही लोकशाही
    Facebook X (Twitter) Instagram
    Trending
    • कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये
    • सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात
    • पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण
    • पाकिस्तानमधील बन्नू येथे भीषण प्राणघातक हल्ला
    • होर्मुज खाडीत भारतीय जहाजाला टार्गेट करून हल्ला!
    • ‘खरात’ प्रकरणावरून पुन्हा एकदा उडाली खळबळ
    • मुख्यमंत्री होताच थलपती विजयने घेतले तीन मोठे निर्णय
    • पावसाळ्यापूर्वी रस्ते दुरुस्तीसह धोकादायक झाडे, फांद्या हटवा
    Facebook X (Twitter) Instagram
    लोकशाही लोकशाही
    Demo
    • होम
    • राष्ट्रीय
    • महाराष्ट्र
      • उत्तर महाराष्ट्र
    • जळगाव
      • जळगाव जिल्हा
    • राजकारण
    • गुन्हे वार्ता
      • अपघात
    • संपादकीय
      • लोकशाही विशेष
    • व्हिडीओ
    • ई-पेपर
    • आणखी
      • हवामान
      • कृषी
      • नोकरी संदर्भ
      • आरोग्य
      • शैक्षणिक
      • खाद्य संस्कृती
      • राशी भविष्य
      • अध्यात्म
      • लोकार्थ
      • पॉडकास्ट
    लोकशाही लोकशाही
    Home»महाराष्ट्र»आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; या प्रकरणी होणार SIT चौकशी
    महाराष्ट्र

    आदित्य ठाकरेंच्या अडचणी वाढल्या; या प्रकरणी होणार SIT चौकशी

    Team Lokshahi LiveBy Team Lokshahi LiveDecember 7, 2023No Comments9 Views
    Facebook Twitter Pinterest LinkedIn WhatsApp Reddit Tumblr Email
    Share
    Facebook Twitter LinkedIn Pinterest Email

    मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क 

    आमदार आदित्य ठाकरे यांच्या अडचणीत वाढण्याची शक्यता आहे. दिशा सालियान प्रकरणी राज्य सरकार आदित्य ठाकरेंची एसआयटीची चौकशी करणार आहे. तसेच एसआयटीसंदर्भात आजच ऑर्डर येण्याची शक्यता आहे. सुजाता सौनिक आज एसआयटी संदर्भात ऑर्डर काढू शकतात, अशी माहिती मिळत आहे. दरम्यान, अतिरिक्त पोलिस आयुक्तांच्या नेतृत्वात एसआयटी पथक काम करणार आहे.

    दिशा सालियानच्या मृत्यू प्रकरणी नेमके आदित्य ठाकरे त्यावेळी कुठे होते? असा प्रश्न अनेक आमदारांकडून सातत्यानं उपस्थित करण्यात आला होता. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. या SIT चौकशीत अनेक पुरावे समोर येणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

    दिशाच्या मृत्यूबद्दल प्रश्न उपस्थित

    मुंबईतील टॅलेंट मॅनेजर दिशा सालियन हिचा मृत्यू 8 जून 2020 रोजी झाला. 8 जूनच्या मध्यरात्री मुंबईतील मालाड येथील गॅलेक्सी रीजेंट इमारतीच्या 14व्या मजल्यावरून 28 वर्षीय दिशा पडली होती. या घटनेच्या दोन दिवसांनी म्हणजेच 11 जून रोजी दिशाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात आले. शवविच्छेदन करण्यास दोन दिवसांचा विलंब का झाला? असे प्रश्न उपस्थित केले जात होते. दिशाच्या मृत्यूबद्दल काही प्रश्न उपस्थित झाले होते.

    चौकशीची घोषणा

    दिशा सालियान मृत्यू प्रकरण गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत आहे. विरोधकांकडून सातत्यानं आदित्य ठाकरेंवर याप्रकरणी आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. भाजप आमदार नितेश राणे याप्रकरणी आदित्य ठाकरेंवर वारंवार थेट आरोप करत होते. त्यामुळे याप्रकरणाला संशियत वळण मिळालेलं आहे. त्यानंतर आता या प्रकरणाची चौकशी थेट एसआटीमार्फत केली जाणार आहे. दरम्यान, डिसेंबर 2022 मध्ये उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिशा सालियान प्रकरणी एसआयटी चौकशीची घोषणा केली होती.

    CBI ची क्लिन चीट

    दिशा सालियान मृत्यू प्रकरणाचा तपास सीबीआयकडून सुरू होता. पण सीबीआयनं या प्रकरणात कोणताही राजकीय अँगल नाही, दिशाचा मृत्यू हा इमारतीवरून तोल जाऊन पडल्यामुळे झाला आहे, असा निष्कर्ष तपासाअंती काढला होता. दिशा सालियन मृत्यू प्रकरणात सीबीआयनं वेगळा गुन्हा दाखल केला नव्हता. मात्र सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणात हे प्रकरणही तपासण्यात आलं होतं. दिशाचा मृत्यू झाला त्यादिवशी ती नशेत होती आणि तोल गेल्यानं छतावरून खाली पडून तिचा मृत्यू झाला, असं सीबीआय तपासात समोर आलं होतं. दिशा सालियान मृत्यू प्रकरणात कोणताही पॉलिटिकल अँगल नाही. शिवाय साक्षीदारांचे जबाब, फॉरेन्सिक रिपोर्ट आणि इतर तथ्यांच्या आधारे सीबीआयनं हा निष्कर्ष काढला असल्याचं स्पष्ट करण्यात आलं होतं.

     फाईल पुन्हा ओपन करा

    मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत राहुल कनाल यांनी दोन महिन्यांपूर्वी शिंदे गटात प्रवेश केला. त्यावेळा राहुल यांनी सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणावर भाष्य केलं. ठाकरेंच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करून शिंदेंच्या शिवसेनेत डेरेदाखल झालेल्या राहुल कनाल यांनी थेट आदित्य ठाकरेंवर पहिला घाव केला होता. सुशांत सिंह राजपूत आणि दिशा सालियान प्रकरणाची फाईल पुन्हा ओपन करुन सखोल चौकशी करण्याची मागणी राहुल कनाल यांनी केली होती. दिशा सालियान प्रकरणाची कारवाई टाळण्यासाठी त्यांनी शिंदे गटात प्रवेश केल्याची टीका होत होती. त्याला उत्तर देताना कनाल यांनी सखोल चौकशीची मागणी केली आहे.

     

    aditya thackeray Disha Salian Case
    Share. Facebook Twitter Pinterest LinkedIn Tumblr Telegram Email
    Team Lokshahi Live
    • Website

    Related Posts

    कांदा विकल्यानंतर खर्च वजा करता उरले फक्त ४०० रुपये

    May 10, 2026

    सदावर्ते यांच्या गाडीवर शाई, सुपाऱ्या फेकणे पडले महागात

    May 10, 2026

    पुन्हा एकदा उष्णता आणि पाऊस असे समीकरण

    May 10, 2026
    Leave A Reply Cancel Reply

    © 2026 Lokshahi Live. Designed by ContentOcean Infotech.
    • Contact Us
    • About us

    Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

    whatsapp-Gif