‘आदिपुरुष’वर झालेली टीका पाहून मेकर्सने घेतला ‘हा’ महत्वपूर्ण निर्णय…

0

मुंबई, लोकशाही न्यूज नेटवर्क

चित्रपट एक वाद मात्र अनेक, अशी परिस्थिती ‘आदिपुरुष’ चित्रपटाची झाली आहे. चित्रपट रिलीज झाल्यापासून टीकांचा सामना करत आहे. आता प्रेक्षकांनी चित्रपटाचे लेखक मनोज मनोज मुन्तशीर यांना धारेवर धरलं आहे. कारण काय तर हनुमानाचा एक डायलॉग “‘तेल तेरे बाप का, आग भी तेरे बाप की और ज़लेगी भी तेरे बाप की’ हे हनुमानाच्या तोंडून निघालेल्या वाक्यांमुळे मनोज मुन्तशीर निशाण्यावर आले आहे. त्याच संदर्भात आता पुन्हा मोठा निर्णय मेकर्सकडून घेण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमातील हनुमानाची प्रेक्षकांना उत्सुकता होता. मराठमोळा अभिनेता देवदत्त नागेने ही भूमिका साकारली आहे. पण जेव्हा त्याचा फर्स्ट लुक समोर आला तेव्हा लोकांनी हा हनुमान मुस्लिम धाटणीचा वाटल्याची टीका सुरू केली. त्याच संदर्भात मोठा निर्णय घेणार आला आहे.

आठवड्याभरात हे वादग्रस्त संवाद बदलाचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. ‘आदिपुरुष’ सिनेमातले वादग्रस्त संवाद बदलण्यात येणार आहेत. काही दिवसांतच सिनेमाची सुधारित आवृत्ती सिने-रसिकांसमोर येणार आहे. आदिपुरुषचे संवाद लेखक मनोज मुंतशीर (Manoj Muntashir) यांनी ट्वीट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. ज्या संवादांमुळे जनतेच्या भावना दुखावत आहेत, ते संवाद बदलण्याचा निर्णय निर्माते आणि दिग्दर्शकाने घेतला आहे, असं मुंतशीर म्हणाले.

Leave A Reply

Your email address will not be published.