अडावद येथे नामांकित कंपन्यांचा नकली माल जप्त

0

अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांची संयुक्त कारवाई

जळगाव , लोकशाही न्यूज नेटवर्क

अडावद येथे नकली झंडू बाम आणि आयोडेक्सचा माल विक्री करण्यासाठी आलेल्या एकाला अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांच्या संयुक्त पथकाने ताब्यात घेतले आहे. मनिष चतुर्भुज बजाज (वय ४५, रा. रामेश्वर कॉलनी, मेहरूण जळगाव), असे संशयित आरोपीचे नाव असून त्याच्याकडून २० हजार २०० रुपयाचे बनावट माल जप्त करण्यात आला आहे.

अडावद येथे एक जण बनावट झंडू बाम आणि आयोडेक्सचा बनावट माल विक्री करण्यासाठी एका मेडिकलवर आला होता. मेडिकलवाल्याने तात्काळ औषध निरिक्षक सहाय्यक आयुक्त डॉ. अनिल माधवराव माणिकराव आणि स्थानिक पोलिसांना याबाबत कळवले. त्यानुसार अन्न औषध प्रशासन विभाग आणि अडावद पोलीस यांच्या संयुक्त पथकाने दि. ९ रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास अडावद गावात मनिष बजाज याला ताब्यात घेतले.

मनिष बजाज हा बनावट आयोडिक्स व झंडु बाम हे खरे असल्याचे ग्रहाकांना भासवून ग्राहकांची व कंपनीची फसवणूक करत होता. त्यांच्या ताब्यातून पथकाने ईमामी ली.कोलकत्ता पश्चीम बंगाल झंडु बाम एकुण नग २५० पत्येकी किं ४२ रुपये, मॅक्सन हेल्थकेयर प्रा.ली. आयोडेक्स एकुण नग २३० प्रत्येकी किंमत ४० रुपये, मॅक्सन हेल्थकेयर प्रा.ली. आयोडेक्स एकुण ३० नग प्रत्येकी किंमत ४० रुपये असा एकूण २० हजार ९०० रुपये किंमतीचा माल मिळून आला. या प्रकरणी डॉ. अनिल माणिकराव यांच्या फिर्यादीवरून मनिष बजाज विरुद्ध २३ भादवी कलम ४२०, ४५६, ४६८, २७४, प्रतिलीपी अधिनियम १९५७ चे कलम ५१,६३ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पो.उप.निरि.चंद्रकांत पाटील हे करीत आहेत. दरम्यान, संशयित आरोपी मनिष बजाज याला पोलिसांनी अटक केली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.