‘ योग’ आयुष्याचे एक प्रेरक गुरूस्थान

0

भडगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क

योग हे मन, शरीर व आत्मा यांचे मिलन. योग अभ्यास करताना मानसिक संतुलन, ध्यान, एकाग्रता, स्थिरता, शारीरिक हालचाल यावर लक्ष केंद्रित करून शरीरातील ताण व तणाव मुक्तता मिळण्यास प्रारंभ होतो. आपल्या दिनचर्या व दैनंदिन व्यवहरातून मोजका वेळ साधत अनेक होणा-या व्याधींवर जालीम उपाय असल्याचे अनुभवावरून सिध्द होते. सुख, शांती व मनोधैर्य प्राप्तीसाठी जीवनात योग्य दिशेने घेवून जाणारी खरी वाटचाल म्हणजे योग. योग हा जबरदस्तीचा नव्हे तर जबरदस्त असा अनुभवांचा ठेवा असल्याचे स्पष्ट दिसून येते.

योग हा असा एक प्रकाश आहे की, जो जीवनाला नेहमी सर्वदूर प्रज्वलीत करीत असतो. जितका जास्तीत जास्त हा अभ्यास केला जाईल तितका आभाळभर फायदा शारीरिक व मानसिकरित्या आपणांस प्राप्त होते. आपले शरीर लवचिक बनल्यानंतर तारुण्यांची चाहूल कायमस्वरूपी असल्याचे भास नेहमी होतो. योग आरोग्यासाठी उपयुक्त असून गुणकारी आहे. योग अभ्यास करताना क्रमाक्रमाने होणा-या शारीरिक हालचाली व सुसज्जता अत्यंत महत्वाची आहे.
योग हा ख-या अर्थाने मानव आणि निसर्ग यामधील सामंजस्याचा व्यक्तीगत एक सर्वांगीण दृष्टिकोन आहे. आपल्या जीवनाची आरोग्याविषयी असलेली ओळख व सूत्रबध्द जीवनशैली याचा व्यापक उपयोग योग क्रियेतून होतो. साहजिकच मेंदूतील विश्लेषणात्मकता व स्मरणशक्तीशी संबंधित असलेल्या सर्व पैलूंचा यशस्वी शास्त्रीय प्रयोग. वेगवान आणि महत्वाकांक्षी स्वप्न साकार करण्यासाठी शाश्वत अभ्यास असणारा योग. बौध्दिक जिज्ञासा उपकृत प्रखरतेने नेण्याचा उत्तम असा हा मार्ग.

जगणे सोपे, सुखी आणि समृध्दीसाठी अनुकरण न करता जे आहे ते माझेच समजून समाधानी असण्याची तीव्र इच्छा प्रस्थापित करण्याचा हा योग मार्ग आहे. अलंकार परिधान करण्यापरी अंलकारीत गोड वाणीतून आपलेसे करून घेण्याचा निष्ठावान तंतोतंत म्हणजे योग मार्ग. मूल्यमापन क्षमतेनूसार आर्वजून तत्वज्ञानाचा प्रसार व प्रचार करण्याचा योगमार्ग. जीवनातील श्रेष्ठ चैतन्याचा आत्मविकासाचा बदल व भौतिक प्रगतीच्या हेतूंचा शिस्तबध्द प्रमाणित म्हणजे हा योग मार्ग.

योग अशी एक कला आहे की, आपल्या विवेक विचारातून बंधुत्वता, सामाजिकता व राष्ट्राप्रती असलेली जागरूकता ही वर्तमान व भविष्यातील सर्व बाबींकरीता उपयुक्त ठरणारच आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.